दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे प्रिया बापट. काही महिन्यांपूर्वीच तिची ‘सिटी ऑफ ड्रिम्स सीझन ३’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये प्रियाला लेसबीयनच्या भूमिकेत पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामधील अभिनेत्रीचा किसिंग इतका व्हायरल झाला की, तिचं एकाबाजूला कौतुक, तर दुसऱ्याबाजूला नकारात्मक प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र याकडे प्रियानं अधिक लक्ष न देता हा माझ्या कामाचा भाग असल्याचं सांगितलं होतं. नुकताच प्रियानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रिया बापटनं एका मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर करत चाहत्यांना विचारलं आहे की, “ही मराठी मालिका कोणाला आठवत आहे का? आणि या फोटोमध्ये तुम्ही मला शोधू शकता का?” प्रियाच्या या प्रश्नाचं उत्तर काही चाहत्यांनी अचूक दिलं आहे. २००० सालच्या ‘दे धमाल’ या मराठी मालिकेच्या सेटवरील हा फोटो आहे.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
priya bapat shares opinion on marathi industry
“क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे ऑफर झाले नाहीत” प्रिया बापटने व्यक्त केली खंत; कलाकार म्हणून मांडलं प्रामाणिक मत

हेही वाचा – Video: राखी सावंत पुन्हा पतीच्या शोधात, भर पावसात डोक्यावर फोडली अंडी; नेटकरी म्हणाले, “हिच्यापेक्षा…”

हेही वाचा – संजय दत्तचा ‘त्या’ गाण्यावरील डान्स पाहून सरोज खान खुर्चीवरून पडल्या होत्या खाली; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?

एका चाहत्यानं प्रियाच्या प्रश्नाला उत्तर देत लिहिलं आहे की, “आम्ही ‘दे धमाल’ या मालिकेला कसं विसरणार. आम्ही दर रविवारी खूप एन्जॉय करायचो.” तर दुसऱ्या चाहतीनं लिहिलं की, “परत सुरू करा रे… आत्ताच्या मुलांना कळेल बालपण म्हणजे काय असतं.” तसेच अजून एका चाहतीनं लिहिलं की, “जो माणूस तुला ओळखू शकणार नाही, तो मराठी माणूस असू शकतं नाही. खूप सारं प्रेम प्रिया ताई.”

हेही वाचा – ‘बवाल’ आणि ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं काय आहे कनेक्शन? बॉयकॉटची होऊ लागली मागणी

प्रिया बापटची ‘दे धमाल’ ही मालिका अजूनही तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. या मालिकेतील बालकलाकार आता मराठीतील लोकप्रिय चित्रपट, नाटकात काम करताना दिसत आहेत. ‘दे धमाल’ मालिकेतील अभिनेता निनाद लिमये सध्या ‘चारचौघी’ या नाटकात काम करत आहे. तर अभिनेता दुश्यंत वाघ ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत दिसला होता.

Story img Loader