छोट्या पडद्यावरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतून प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेत मोनिका हे नकारात्मक पात्र अभिनेत्री प्रिया मराठे साकारत आहे. मात्र आता या मालिकेला प्रिया मराठेने रामराम केला आहे. नुकतंच एक व्हिडीओ पोस्ट करत तिने यामागचं कारणही सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रिया मराठेचा हा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने पोस्ट केला आहे. या व्हिडीओत प्रिया मराठे म्हणाली, “नमस्कार, तुम्ही मला ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना पाहत होतात. पण यापुढे मी ती भूमिका साकारणार नाही. आता मी तुमचा निरोप घेते आहे. अचानक तब्येतीची आलेली अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागतेय. ही भूमिका करताना मला खूप मजा येत होती. तुम्हालाही मोनिका खूप आवडत होती. पण जो वेळ मी त्यांना देत होते तो वेळ कुठेतरी अपुरा पडत होता.”
आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

“बाकीच्या कलाकारांच्या वेळा, क्रिएटिव्ह टीम, प्रोडक्शन टीम, ती भूमिका इतकी डिमांडिंग होती. या सगळ्याच कारणांमुळे मला मालिकेतून निरोप घ्यावा लागतो. पण तुम्ही मालिका पाहणं सोडू नका. कारण माझी भूमिका आता दुसरी अभिनेत्री करणार आहे. मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे तुम्हाला भेटायला एका नव्या मालिकेतून एका नव्या भूमिकेतून”, असे प्रिया मराठेने म्हटलं आहे.

आणखी वाचा : Video : “महाराष्ट्राचं राजकारण कमी गजकर्ण जास्त!” अजित पवारांच्या बंडावर कोकण हार्टेड गर्लचा संताप, म्हणाली “सगळं वाट्टोळं…”

हा व्हिडीओ शेअर करताना स्टार प्रवाहने भावूक कॅप्शन दिलं आहे. “मोनिका म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठे घेत आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप.आजवर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे प्रियाने ‘मोनिका’ हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.आम्हाला खात्री आहे आपण सगळेच प्रियाला मोनिका च्या रूपात खूप मिस करू. पण भविष्यात लवकरच ती पुन्हा आपल्या भेटीला येईल एका नव्या भूमिकेत. प्रिया तुला स्टार प्रवाह आणि महाराष्ट्राच्या अखंड प्रेक्षक वर्गातर्फे खूप खूप शुभेच्छा.” असे स्टार प्रवाहने म्हटले आहे.

दरम्यान प्रिया मराठेच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर ‘तू मालिका सोडू नकोस’, ‘आम्ही ही मालिका पाहणार नाही’, ‘तुला खूप मिस करु’, अशा कमेंट केल्या आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.