‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. प्रियदर्शनीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात काम करण्यापूर्वी तिने डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. नुकतंच तिने याचा अनुभव सांगितला.
प्रियदर्शनी इंदलकर सध्या तिच्या आगामी ‘शांतीत क्रांती’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या निमित्ताने तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियदर्शनीने तिच्या डबिंग आर्टिस्टच्या करिअरबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : Video : “…अन् मी त्या मोहाला बळी पडलो”, उमेश कामत-प्रिया बापटने परदेशात केलं असं काही…
“मी सुरुवातीला छोट्या जाहिरातींसाठी डबिंग केलं. त्यानंतर मग काही चित्रपटातील पात्रांसाठी डबिंग करण्याची संधी मिळाली. यात हॉलिवूड-दाक्षिणात्य चित्रपट, हिंदी चित्रपट यांचा समावेश होता. मी खासकरुन अॅनिमेटेड चित्रपटांसाठी डबिंग करु लागले. मुंबईत विविध स्टुडिओमध्ये फोन करुन आवाजाच्या ऑडिशन्स पाठवणं, ऑडिओ बुकला आवाज देणं हे केलं.
घरी आर्थिक चणचण होती, असं काही नाही. पण स्वत: कमावलेल्या पैशांचं समाधान वेगळं असतं. मी साधारण ५० चित्रपटांसाठी व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केलंय. डबिंगनं माझ्यातील कलाकार जिवंत ठेवला, असे प्रियदर्शनी इंदलकरने म्हटले.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
दरम्यान, प्रियदर्शनी इंदलकरला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने ओळख मिळवून दिली. या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी ती एका मराठी चित्रपटात झळकली. तिचा ‘फुलराणी’ हा चित्रपट बुधवारी २२ मार्चला प्रदर्शित झाला होता.