‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. टीआरपीच्या शर्यतीमध्ये ही मालिका ‘स्टार प्रवाह’वरच्या गाजलेल्या अनेक मालिकांना मागे टाकतं अव्वल स्थानावर आहे. गेल्या कित्येक माहिन्यांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. अशा या लोकप्रिय मालिकेत खलनायिकेची भूमिका अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने उत्तमरित्या साकारली आहे. पण या भूमिकेवरून अभिनेत्रीला आणि तिच्या आईला नातेवाईक टोमणे मारतात. याचा किस्सा तिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितला.
‘स्टार मीडिया मराठी’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलला अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने नुकतीच मुलाखती दिली. यावेळी तिने खलनायिकेची भूमिकेत झळकल्यानंतर नातेवाईक कशाप्रकारे टोमणे मारू लागले याचा किस्सा सांगितला. प्रियांका म्हणाली, “माझ्या नातेवाईकांपैकी एकजण माझ्या आईला फोन करून म्हणाले, ‘प्रियांकाला काय तिच्या स्वभावाप्रमाणेच भूमिका मिळाली.’ मला असं झालं की, मी कुठे कोणाचे पैसे चोरी केलेत? किंवा मी कुठल्या पुरुषावरती हात टाकलाय? असं का म्हणावं? मलाही फोन करू म्हणायचे, ‘अरे तुला तर ही भूमिका करताना फार अवघड जात नसेल. अगदी तुझ्यासारखीच तुला भूमिका मिळालीये.’ हे ऐकून मला असं झालं की, मी कधी असं वागली आहे?”
पुढे टोमणे मारणाऱ्या नातेवाईकांना उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, “तुम्हाला जर असं वाटतं असेल तर ऑल द बेस्ट. पण मी खरंच अशी नाहीये. अजिबात प्रिया सारखी नाहीये. मी जे माझं नाही त्याच्यावरती कधीच हक्क गाजवतं नाही. मी माझ्या दिसण्यावरती पण आयुष्यात कधीच गर्व दाखवला नाही. प्रिया आणि प्रियांका यात काहीही साम्य नाही.”
हेही वाचा – “त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती…” ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सना उत्तर, म्हणाल्या…
दरम्यान, प्रियांका तेंडोलकरने ‘ठरलं तर मग’ मालिकेपूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘फुलपाखरू’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’, ‘साथ दे तू मला’ या मालिकांमध्ये ती झळकली आहे.