नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत प्रिया बेर्डे झळकत आहेत. प्रिया बेर्डे यांनी सध्या सुरु असलेल्या लावणी कार्यक्रमाबद्दल भाष्य केले आहे.
नुकतंच प्रिया बेर्डे यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सध्या सुरु असलेली लावणी, त्यात केले जाणारे अंगविक्षेप याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : “मला तुझा खूप…”, सुव्रत जोशीला तृतीयपंथीयांच्या भूमिकेत पाहून स्वानंदी टिकेकरची पोस्ट; म्हणाली “‘ताली’मध्ये…”
“लावणी हा नृत्यप्रकारात सादरीकरण फार महत्त्वाचं असतं. ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात जेव्हा अनेक मुली या लावणी सादर करतात, ते बघून वाईट वाटत नाही. पण अलीकडे लावणी करण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत”, असे प्रिया बेर्डे यांनी म्हटले.
“पूर्वी या समस्या नव्हत्या. मी देखील पूर्वी लावणी करायचे. पण मी कधीही कुणाच्या नजरेत नजर घालून डान्स केलेला नाही. आम्ही दूर कुठेतरी बघून अदा किंवा नृत्याचं सादरीकरण करायचो. पण आता नऊवारी साडीपासून सर्व गोष्टी बदलल्या आहेत. मुख्य म्हणजे प्रेक्षकांनाही ते आवडतंय. प्रेक्षक हल्ली दर्जेदार लावण्या पाहायला कुठे येतात, हीच आता मोठी समस्या झाली आहे.
लावणी हा एक अदाकारीचाच भाग आहे. मी तोंडाला स्कार्फ गुंडाळून हल्लीच्या लावणीचे कार्यक्रम पाहते. मला ती लोक काय करतात हे पाहायचं असतं. पहिला एक दोन डान्समध्ये लावणी दाखवली जाते. त्यानंतर मग पूर्ण डान्स हा वेगवेगळ्या प्रकारातील असतात. जे अजिबात पाहण्यासारखे नसतात”, असेही प्रिया बेर्डेंनी सांगितले.
आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…”
दरम्यान, प्रिया बेर्डे यांच्याव्यतिरिक्त अभिनेते किरण मानेसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांच्या भूमिकेत किरण माने पाहायला मिळणार आहेत. ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका १५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.