मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून राधिका देशपांडेला ओळखले जाते. राधिकाने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीच्या मैत्रिणीचे म्हणजे देविकाचे पात्र साकारले होते. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. नुकतंच राधिकाने तिच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट केली आहे.
राधिका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : “कोणाचा आदेश पाळण्याची जबरदस्ती नाही”, मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, मुख्यमंत्र्यांना टॅग करत म्हणाली “नाकावरची माशी…”
राधिका देशपांडेंची पोस्ट
“वाढीव!
ही ‘फुलं’ जी तुम्हाला गुलदस्त्यात दिसता आहेत ती मला सकाळीच कोणीतरी पाठवली. फुलंच ती! मी ती मुलांबरोबर वाटून टाकली. त्यामुळे ती वाढीव झाली, अधिक हसरी झाली! टवटवीत, टपोरी, ताजी तेजस्वी झाली! ‘फूलपाखरं’ देखणी! बाग मात्र माझी.
४३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही ‘माळ फूलं‘ वृध्दींगत होऊ दे! प्रेम वाढीव राहू दे. आणिक काय हवं!”, असे राधिकाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान राधिकाच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, ‘अशीच कायम हसत राहा’, अशा अनेक कमेंट तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.