कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी व्हिडीओ, फोटो, आपली मत व्यक्त करत असतात. पण काही वेळेला यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. यालाही सडेतोड उत्तर कलाकार मंडळी देतात. असाच प्रकार अलीकडेच अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्याबरोबर घडला आहे. तिच्या साडी नेसण्याच्या पद्धतीवरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं. पण त्याला रुचिराने स्पष्टच उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेनं बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाबरोबर केलं काम, म्हणाली, “तुझ्याबरोबर…”

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रुचिरा जाधवला आमदार राम कदम यांच्या दहीहंडीला आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी तिनं सुंदर साडी नेसली होती. याचा व्हिडीओ रुचिराने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण तिची साडी नेसण्याची पद्धत एका नेटकरीला खटकली आहे. ‘तू खूप चुकीच्या पद्धतीची साडी नेसली आहे. सणासुदीला अंगप्रदर्शन का केलंय?’ अशी त्या नेटकरीनं कमेंट केली. यावर रुचिरा भडकली तिनं त्या नेटकरीला सडेतोड उत्तर दिलं. तसंच याविषयी रुचिराने सविस्तर मत इन्स्टाग्राम स्टोरीवरही शेअर केलं.

हेही वाचा – “कॉलेजमध्ये असताना…”, तेजश्री प्रधानचा पहिल्या प्रपोजबद्दल खुलासा, म्हणाली…

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचं पहिलं क्रश कोण होतं? जाणून घ्या

रुचिरा त्या कमेंटला उत्तर देत म्हणाली की, “माझी फक्त मान, चेहरा आणि कंबरेचा थोडासा भाग दिसतोय. मला असं वाटतंय, हीच साडी नेसण्याची पद्धत आहे. तुमची अपेक्षा काय आहे की, मी भरपावसात पदर सोडायचा का? की बुरखा घालायला हवा होता? आणि मुळात माझी मर्जी… माझा कन्फर्ट. स्त्री ने काहीही परिधान केलं, तरी त्याला नावं ठेवणारे भेटतील, हे तुम्ही आता सिद्ध केलंय. हा दृष्टीकोनाचा भाग आहे. माझ्या आवडत्या सणाच्या शुभेच्छा. एक सूचवते की, एखाद्या स्त्रीविषयी वैर बाळगू नये हे फार हानीकारक असते. काळजी घ्या.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ‘हा’ आहे चिडका बिब्बा; समीर चौघुले म्हणाले…

तसेच रुचिराने हे सडेतोड उत्तर दिल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी देखील शेअर केली. त्यामध्ये तिनं लिहीलं की, “खरंतर मला फरक नाही पडत मला कोण काय बोलतंय. पण वाईट याचं वाटतं की, आपण चंद्रावर पोहोचलो तरी अजून “स्त्री ने काय घालावं, काय नाही” इथेच अडकून आहोत. मी खरंतर अशा कमेंट ना दुर्लक्ष करते. पण जिथे “स्त्रीद्वेष” असेल आणि “स्त्रीत्वावर” गोष्ट येईल, तिथे मी बोलणार…ही छोटीशी गोष्ट दिसते. पण अशाच छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं स्त्रियांना महागात पडलंय. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा द्वेष करते. सूचित करते की, हे पहिल्यांदा घडतंय असं नाही ही स्त्री उगाच माझ्या पोस्टवर नकारात्मक कमेंट करत असते.”

दरम्यान, रुचिराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात झळकली होती. तसेच यापूर्वी ती ‘झी मराठी’वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress ruchira jadhav answer to trollers about saree wearing pps
Show comments