दरवर्षी जगभरात १९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला करतो. पुरुषांशी निगडित वेगवेगळे विषय आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. याला युनेस्कोनेही पाठिंबा दिला आहे. या निमित्ताने अनेक कलाकार हे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रुचिरा जाधव हिनेही यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या वडिलांना आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रुचिरा जाधव ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानतंर तिने अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण दिले होते. त्यात तिने बिग बॉससह विविध मुद्द्यांवर भाष्य केले होते. बिग बॉस मराठीच्या घरात रोहित आणि रुचिराचे मतभेद झाले. यानंतर तिने त्याला अनफॉलो केले होते. याबद्दलही एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये सांगितले होते. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने तिच्या वडीलांचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा- “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली
रुचिरा जाधवची इन्स्टाग्राम पोस्ट
“माझे लाडके पप्पा,
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा
तुम्ही माझे एकमेव हिरो आहात.या गाण्यातल्या ओळींप्रमाणे आतापर्यंत तुम्ही आम्हाला जपलंत, पण यापुढे मी तुम्हाला जपणार आहे…सर्वार्थाने
एवढंच बोलेन, तुम्ही तुमच्या मुलीवर जसा आजपर्यंत विश्वास ठेवलात, तसाच यापुढेही ठेवा. तुम्ही ताठ मानेने जगायला शिकवलंत, तुमची शिकवण, तुमचे आदर्श कधीच विसरणार नाही. तुमची मुलगी स्वतः तर झुकणार नाहीच, आणि तुम्हाला झुकू देण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी समानता आणि समतोल यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. त्यामुळे जेवढा महिला दिन महत्वाचा असतो, तितकाच पुरुष दिन देखील असतो. पण साथ मात्र नेहमी सत्याची देईन”, असे तिने यात म्हटले आहे.
आणखी वाचा : “अपूर्वा नेमळेकर खोटारडी…” बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिरा जाधवचं स्पष्ट वक्तव्य
दरम्यान बिग बॉस मराठीचा चौथं पर्व सध्या बराच गाजतंय. नुकत्याच झालेल्या एलिमिनेशनमध्ये रुचिरा जाधव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. रुचिरा या पर्वात तिचा रिअल लाइफ बॉयफ्रेंड डॉक्टर रोहित शिंदेबरोबर सहभागी झाली होती. पण आता रोहित बिग बॉस घरात कायम असून रुचिरा मात्र घरातून बाहेर पडली आहे. बिग बॉसच्या घरात असताना दोघांमध्येही मतभेद झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिराने बॉयफ्रेंड रोहित शिंदेला सोशल मीडियावर अनफॉलो केलं.
रुचिराने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशन घेतलं होतं. या लाइव्ह सेशनमध्ये तिने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलं. तिच्या आणि रोहितच्या नात्यावरही भाष्य केलं. तसेच घरातील इतर सदस्यांबद्दलही मत व्यक्त केलं.