ईदनिमित्त सोमवारी ( १७ जून ) देशभरात मोठा जल्लोष पाहायला मिळाला. सर्वजण एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देत होते. अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ईदनिमित्त खास शुभेच्छा दिल्या. परंतु, अशातच एका मराठी अभिनेत्रीला ईदच्या शुभेच्छा दिल्यावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधवने इन्स्टाग्रामवर ईदनिमित्त काही फोटो शेअर केले. यावेळी पोस्टच्या कॅप्शनमध्ये ईद मुबारक एका ट्रॅव्हल शोसाठी बहरीनमध्ये शूटिंग करताना खूप छान अनुभव आला असं तिने लिहिलं होतं.

रुचिराने ईदच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अभिनेत्रीच्या पोस्टवर लागोपाठ “अनफॉलो”, “हिला अनफॉलो करा” अशा कमेंट्स येऊ लागल्या. याशिवाय एका युजरने “ईद मुबारक वैगरे कशाला? मराठी सण आहेत एवढे मग हे कशाला??” असा प्रश्न कमेंट्समध्ये उपस्थित केला होता. तर, आणखी एका युजरने “बायोमध्ये धर्मो रक्षति रक्षितः लिहायचं आणि इकडे ईदच्या शुभेच्छा द्यायच्या” अशी कमेंट करत रुचिराला ट्रोल केलं होतं. या सगळ्या नेटकऱ्यांसाठी एक भलामोठा मेसेज लिहित अभिनेत्रीने स्पष्ट शब्दांत आपली बाजू मांडली आहे.

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
ruchira
अभिनेत्री रुचिरा जाधवच्या पोस्टवरील कमेंट्स

हेही वाचा : तारीख ठरली! ‘झी मराठी’वर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार, पोस्टरमध्ये दडलंय उत्तर…

“मला सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणारा द्वेष पाहून खरंच धक्का बसला. बरं मी डेनिम, स्कार्फ आणि शेड्स असलेली कुर्ती परिधान केली होती. हा माझा ‘पोशाख’ आहे. मी जे करतेय ते माझं काम आहे. कर्म आणि धर्म ‘पूर्णपणे समजणाऱ्यांसाठी ही पोस्ट आहे. बाकीच्या लोकांना काय बोलावं मला खरंच कळत नाहीये. महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचंय, ‘महाराजांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायला शिकवलं’? ज्या लोकांनी माझ्या इन्स्टाग्राम बायोसंदर्भात प्रश्न उपस्थित केले त्यांना “गीतेतला कर्मयोग समजला असता, तर तुमची reaction वेगळी असती” तुमच्या भावनांचा आदर आहेच पण, याचा अर्थ असा नाही की, तुमचा दृष्टीकोन प्रत्येक वेळी योग्य असावा. हरे कृष्णा… PS : मी काय करतेय हे मला माहिती आहे.” अशी पोस्ट लिहित रुचिराने तिला ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : “मी एका ठराविक आडनावाची आहे म्हणून मला…”, इंटस्ट्रीतील भेदभावाबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर स्पृहा जोशीने मांडलं मत

दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं, झालं तर ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे अभिनेत्री रुचिरा जाधव घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर तिने अलीकडेच ‘ठरलं तर मग’ मालिकेत एक लहानशी भूमिका साकारली होती. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच रुचिराने नवीन घर आणि गाडी खरेदी करत आपल्या आई-वडिलांना गोड सरप्राइज देत स्वप्नपूर्ती केली आहे.