एखाद्या सार्वजनिक ठिकाणी कलाकारांना पाहिलं की चाहते त्यांच्याभोवती गर्दी करतात. सेल्फी काढण्यासाठी धडपड करतात. इतकंच नव्हे तर आपल्या लाडक्या कलाकारावर चाहत्यांचं प्रचंड प्रेम असतं. कोणी चाहता आवडत्या कलाकाराचा टॅटू गोंदावून घेतो तर काही जणं कलाकारांना भेटण्यासाठी लांबचा प्रवास करुन मुंबई गाठतात. मात्र काही कलाकारांना चाहत्यांचा विचित्र अनुभव आलेलाही पाहायला मिळतं. असंच काहीसं प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रुपाली नंद हिच्याबाबत घडलं.
‘गोठ’ या मालिकेमुळे रुपाली नावारुपाला आली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. शिवाय छोट्या पडद्याद्वारे रुपल नंद हा नवा चेहरा सर्वांच्या भेटीला आला. रुपलने मराठी मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. पण एकदा तिला एका वेगळ्याच प्रसंगाचा सामना करावा लागला होता. याबाबत तिने स्वतः ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – “पोट खूप सुटलं आहे” म्हणणाऱ्यावर भडकली अभिज्ञा भावे, म्हणाली, “पोटाकडे लोकांचं लक्ष…”
रुपल म्हणाली, “मी एकदा स्ट्रीट शॉपिंग करत होते. खरेदी करत असताना पोलिसांनी एका व्यक्तीला मानेला धरुन माझ्यासमोर उभं केलं. पोलिस असं का करत आहेत हे नेमकं मला तेव्हा कळालं नाही. पोलिसांनी मला सांगितलं की हा तुमचे फोटो काढत आहे. मग पोलिसांनी मला काही गोष्टी समजून सांगितल्या”.
“तुमचा चाहता असो किंवा इतर कोणी व्यक्ती तुमचे लपून फोटो काढत असेल तर त्याला सांगा. पोलिसांनी त्या चाहत्यालाही समजावून सांगितलं. शिवाय मलाही काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून पोलिसांना घाबरायची गरज नाही ते आपल्या मदतीसाठीच असतात याची जाणीव मला झाली”. रुपलच्या मदतीला पोलिस अगदी धावून आले.