‘बड़ी दूर से आये है’ हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली रुपाली भोसले आता मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून रुपाली अधिक प्रसिद्धी झोतात आली. या मालिकेत तिने साकारलेली संजनाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. पूर्वी संजना ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरेने साकारली होती. पण काही काळानंतर दिपालीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि तिच्या जागी रुपालीने ‘आई कुठे काय करते’ मालिकेत एन्ट्री झाली. दिपाली प्रमाणे तितक्याच ताकदीने रुपालीने संजनाची भूमिका पेलली. त्यामुळेच तिला सर्वोकृष्ट खलनायिकेचा पुरस्काराने गौरविण्यात आलं. अशा या लोकप्रिय खलनायिकेची म्हणजे रुपाली भोसलेची नुकतीच ‘बिग बॉस १८’ फेम शिल्पा शिरोडकरबरोबर ग्रेटभेट झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९०च्या दशकातील बॉलीवूडची सेन्सेशनल क्वीन शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात झळकली होती. या मराठमोळ्या शिल्पा शिरोडकरचे बरेच मराठी कलाकार चाहते आहेत. त्यापैकी एक म्हणजे रुपाली भोसले. रुपाली आणि शिल्पाची नुकतीच भेट झाली. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

रुपालीने शिल्पा शिरोडकरचे फोटो शेअर करत लिहिलं, “काल एका पुरस्कार सोहळ्यात या सुंदर अभिनेत्रीला आणि मनाने निर्मळ असणाऱ्या व्यक्तीला भेटले. आधी फॅन म्युमेंट त्यानंतर मी तिच्याशी बऱ्याच दिवसांनी खूप गप्पा मारल्या. जी आम्ही १०५ दिवसांत खूप प्रेमळ, काळजी घेणारी व्यक्ती पाहिली. खरंच तू जशीच्या तशीच आहेस. आम्ही तुझे चाहते तुला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. शिल्पा ताई अशीच कायम हसत राहा आणि लोकांना प्रेम देत राहा. तुला आगामी प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया…लवकरच आपण पुन्हा भेटू सुंदर मुली. आय लव्ह यू.”

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यापासून रुपाली वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. तसंच ती तिच्या आईला घरगुती व्यवसायात हातभार लावताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आईबरोबर वेगवेगळे पदार्थ बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. पण, आता रुपाली भोसले संजनानंतर कोणत्या वेगळ्या भूमिकेत झळकणार? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.