Aai Kuthe Kay Karte: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ अखेर बंद होतं आहे. ३० नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं. त्यामुळे सुरुवातीला मालिकेचा टीआरपी खूप चांगला होता. पण, मध्यंतरी मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांसाठी रटाळवाणे होते. प्रेक्षक सतत मालिका बंद करण्याची मागणी करत होते. पण, तरीही मालिका लांबवली. यामागचं नेमकं कारण आहे? हे संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेने सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकताच ‘अल्ट्रा मराठी बझ’ चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिला विचारलं की, शेवटचं प्रेक्षकांना काय सांगायचं आहे? यावेळी रुपालीने मालिका का लांबवली याबाबत सांगितलं. रुपाली नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

हेही वाचा – Bigg Boss 18: शिल्पा शिरोडकरला धाकट्या बहिणीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, आहे दाक्षिणात्य सुपरस्टारची पत्नी

रुपाली भोसले म्हणाली की, ‘आई कुठे काय करते’ मालिकेला पाच वर्ष झाली. एखादी मालिका इतकी वर्षे चालणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते. कलाकारांसाठी तर असतेच. पण त्याच्याबरोबर बॅकस्टेजच्या लोकांसाठी पण खूप मोठी गोष्ट असते.”

पुढे रुपाली भोसले म्हणाली, “बऱ्याचदा असं म्हणण्यात आलं की, बंद करा. मालिका कशाला चालू ठेवली आहे? तर जेव्हा दुपारची वेळ मिळाली तेव्हा आम्ही आमचा विचार न करता बॅकस्टेजला जे काम करतात त्यांचा पण खूप विचार केला होता. कारण त्याच वेळेला काही जणांनी काही गोष्टी केल्या होत्या. काही घेतलं होतं. काही चालू होतं. त्यामुळे त्यांचा आम्ही हा विचार करून दुपारच्या वेळेसाठी ओके म्हटलं होतं. पण आता ‘आई कुठे काय करते’ मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. तुमचा निरोप घेत आहे. पण तुमचं आणि आमचं नातं कायम जोडलं गेलं आहे. त्यामुळे परत पुन्हा आपण नव्या जोमात, नव्या रुपात भेटूच. आजवर जसं आमच्या सगळ्यांवर प्रेम केलं. रुपाली म्हणून माझ्यावर जितकं प्रेम केलं. तसंच पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद द्यालं आणि प्रेम ठेवालं. खूप खूप धन्यवाद”

हेही वाचा – संजनाकडून काय घेऊन जाणार? अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”

हेही वाचा – “आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, आता पुढील पाच वर्षे…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पोस्ट करत म्हणाले…

दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress rupali bhosle reveal reason behind of aai kuthe kay karte serial extended softnews pps