मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने सिनेसृष्टीत स्वत:च वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘नांदा सौख्य भरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकांमध्ये ती झळकली. नाटक, मालिका, चित्रपटांतून अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. काही दिवसांपूर्वी ऋतुजाने नवीन घर खरेदी केले आहे. आता तिने याची झलक दाखवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋतुजा बागवेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या नवीन घराचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाची पूजा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : गुपचूप साखरपुड्यानंतर अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या पहिल्या केळवणाचा थाट, फोटो समोर

ऋतुजाचे आई-वडील ही पूजा करत आहेत. तिच्या घरातील हॉलमध्ये ही पूजा सुरु आहे. तिच्या घराच्या खिडकीतून सुंदर निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच तिने एका बाजूला ट्रॉफीही ठेवल्या आहेत. या फोटोला तिने असेच आशीर्वाद असू द्या, असे कॅप्शन दिले आहे.

ऋतुजा बागवेचे नवीन घर

दरम्यान ऋतुजा ही सध्या तिच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही उंच भरारी घेताना दिसत आहे. तिने मुंबईत घर खरेदी केले आहे. तिचं हे घरं कोणत्या ठिकाणी आहे, याची माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : प्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या निर्मात्याने थकवले पैसे, शशांक केतकरचा आरोप, म्हणाला “मोठ्या कलाकारांना…”

ऋतुजाचं हे नवीन घर उंचावर आहे. तर तिथून आजूबाजूचा हिरवागार परिसर दिसतो. तिच्या बिल्डिंगच्या शेजारी कुठलीही वेगळी बिल्डिंग नसल्यामुळे तो संपूर्ण परिसर झाडांनी भरलेला आहे. तर त्याच्या पाठी डोंगरही आहे. त्या डोंगरावर जेव्हा धुकं येतं तेही ऋतुजाच्या घरातून स्पष्ट दिसतं.