‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली सई लोकूर नेहमी चर्चेत असते. मनोरंजन विश्वापासून दूर असली तरी सई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती वैयक्तिक जीवनातील अनुभव देखील चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

सईने गेल्या वर्षी १७ डिसेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने मुलीचं नाव ताशी असं ठेवलं आहे. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होतो. नुकताच सईने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने सईला दुसऱ्या बाळाविषयी विचारले. तेव्हा सई काय म्हणाली? जाणून घ्या…

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”

हेही वाचा – Video: “गणपती बाप्पा मोरया…”, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या सेटवरील पहिला व्हिडिओ सचिन पिळगांवकरांनी केला शेअर

अभिनेत्री सई लोकूरला इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी तिचं बाळंतपण, गर्भसंस्कार, ताशी याविषयी अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने विचारले की, सई तू मुलीला रामरक्षा ऐकवते का? यावर सई म्हणाली, “होय. माझ्या संपूर्ण गर्भधारणेच्या वेळी मी केलं आहे.” तर दुसऱ्या चाहत्याने विचारलं, “दुसऱ्या बाळाचा प्लॅन आहे?” या प्रश्नाचं उत्तर देत सई म्हणाली, “हाहाहा…खूप घाई झाली आहे का? आधी मला पहिल्या बाळंतपणातून नीट बरं होऊ दे”

हेही वाचा – “सरोगसी सारखा…”, ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपट पाहून प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोची प्रतिक्रिया, म्हणाली, “तुझा…”

दरम्यान, सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने काही मराठी, हिंदी चित्रपटात काम केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकल्यानंतर सई ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर असून लेकीबरोबर एन्जॉय करत आहे.

Story img Loader