मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकर हे नाव कायमच वरच्या स्थानी असतं. सई ताम्हणकर ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. सईने फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सई ताम्हणकरला नुकतंच एक महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आहे. त्या निमित्ताने तिने पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच सईने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात तिने तिला यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार मिळाला आहे.
आणखी वाचा : मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकरने रोवला मानाचा तुरा, ‘IIFA’ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराने गौरव

“झी चित्र गौरव २०२३ ! या पुरस्कारामुळे मी कृतकृत्य झाले आहे , खूप खूप आभार, झी मराठी”, असे कॅप्शन सई ताम्हणकरने या फोटोंना दिले आहे. सई ताम्हणकरची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान सई नुकतीच ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटात झळकली होती. त्याबरोबर ती ‘मीडियम स्पायसी’ या चित्रपटात ललित प्रभाकर आणि पर्ण पेठेसोबत दिसली होती. सध्या ती नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरील नव्या सिरीजमध्ये दिसतेय ज्यात ती महाराष्ट्रातील निरनिराळ्या राज्यांना भेट देताना दिसत आहे.