अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही आता स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ सारख्या नावाजलेल्या पुरस्कारांनी सईला सन्मानित करण्यात आलं. मराठीसह बॉलिवूडमध्येही तिने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. नुकतंच सईने सिनेसृष्टीतील महिला आणि पुरुषांबद्दल केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल भाष्य केले.
सई ताम्हणकर नुकतंच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी अवधूत गुप्तेने सईला सिनेसृष्टीसह तिच्या खासगी गोष्टींबद्दल प्रश्न विचारले. यादरम्यान अवधूतने मराठी चित्रपट क्षेत्रात पुरुषांना जशी वागणूक दिली जाते, तशी स्त्रियांना दिली जात नाही, याबद्दल विचारणा केली.
आणखी वाचा : “तुझ्या आयुष्यात प्रेम येतं, तेव्हा…”, गिरीजा ओकने केला सई ताम्हणकरबद्दल खुलासा; म्हणाली “जो रोमान्स…”
त्यावर सईने स्पष्टपणे उत्तर दिले. “पुरुषांचं यश स्त्रियांच्या तुलनेत जास्त चांगल्या पद्धतीने साजरं केलं जातं. समान वेतन वैगरे या खूप लांबच्या गोष्टी आहेत. त्या तर अजून सिनेसृष्टीत घडलेल्याच नाहीत”, असे सई म्हणाली.
दरम्यान सई ताम्हणकरच्या थेट उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच या कार्यक्रमात तिचा स्पष्टवक्तेपणाही अनेकांना आवडला. याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत.