सुव्रत जोशी व सखी गोखले(Sakhi Gokhale) हे सध्या ‘वरवरचे वधू वर’ या नाटकामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच त्यांना त्यांच्या या नाटकासाठी झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात अनुरूप जोडीचा पुरस्कार मिळाला आहे. सखी व सुव्रत हे पहिल्यांदा २०१५ साली प्रदर्शित झालेल्या दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या मालिकेत सखी व सुव्रतबरोबरच स्वानंदी टिकेकर, पूजा ठोंबरे, पुष्कराज चिरपूटकर आणि अमेय वाघ हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. आता सखीने अमेय वाघबाबत केलेले वक्तव्य केले आहे.

एकमेकांच्या कुरघोड्या…

सुव्रत व सखी गोखले यांनी नुकताच महाराष्ट्र टाइम्सबरोबर संवाद साधला. त्यावेळी त्यांना एक टास्क दिला होता. काही वैशिष्ट्ये सांगितल्यानंतर त्यांना काही व्यक्तींची नावे सांगायची होती. गोड म्हटलं की कोण आठवतं असं विचारल्यावर सखीने सुव्रतचं नाव घेतलं. तर सुव्रतने सखीचं नाव घेतलं. त्यानंतर सखीने स्वप्नील जोशीचे नाव घेतले. तो सगळ्यांशी खूप प्रेमाने वागतो. त्यामुळे तो खूप गोड आहे. तर सुव्रतने चिन्मयी सुमित ही खूप गोड आहे. सखीच्या ती जवळची आहे.तिने मलाही जावई म्हणून मला स्वीकारलं आहे. ती माया लावते. ती फार आनंद आणि उत्साह देणारी आहे. तिखट कोण आहे, असे विचारल्यानंतर सखी गोखले म्हणाली, “अमेय वाघ. कारण आतापर्यंतच्या आयुष्यात जेवढी भांडणं कोणाशी झाली नाहीयेत तेवढी अमेयशी झाली आहेत. आम्ही एकमेकांशी खूप भांडतो. एकमेकांच्या कुरघोड्या करतो. टिंगल करतो. तो माझा खूप जवळचा मित्रसुद्धा आहे. पण, जवळच्या मित्रांबरोबर तुम्ही असे वागू शकता. त्यामुळे तो तिखट आहे.

सुव्रतने स्वानंदी टिकेकरचे नाव घेत म्हटले की तिच्यात जो ठसका आहे. तीच तिची कलाकार म्हणून शक्ती आहे, असं मला वाटतं. मुलांनीच तिखट असू नये, मुलांनीदेखील तिखट असावं. पुढे त्याने स्वानंदीला उद्देशून म्हटले की स्वानंदी तू तिखट आहेस आणि छान आहेस, अशीच राहा.

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेबद्दल बोलायचे तर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत सुव्रत जोशीने सुजय ही भूमिका साकारली होती. रेश्मा ही भूमिका सखी गोखलेने साकारली होती. अ‍ॅनाच्या भूमिकेत अभिनेत्री पूजा ठोंबरे दिसली होती. पुष्कराज चिरपुटकरने आशू ही भूमिका साकारली होती. कैवल्यच्या भूमिकेत अभिनेता अमेय वाघ दिसला होता. तर, स्वानंदी टिकेकरने मीनल ही भूमिका साकारली होती. आता हे कलाकार विविध माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.