मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे म्हणजेच मातृदिन साजरा केला जातो. काल जगभरात मातृदिन साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक कलाकारांनी ‘मदर्स डे’ निमित्त पोस्ट शेअर केल्या आहेत. मराठी अभिनेत्री सखी गोखलेने तिची आई आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.

अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी मराठीसोबतच हिंदी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. त्या मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सखी गोखलेने इन्स्टाग्रामवर एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला तिने लांबलचक कॅप्शन देत आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “आमच्या एकत्र येण्यामुळे…” साखरपुड्यानंतर परिणीती चोप्राने केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “या काळात…”

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

सखी गोखलेची पोस्ट

“‘झी’च्या टीमने जेव्हा माझ्याकडे त्यांनी बनविलेला हा सुंदर चित्रपट पाठविला, तेव्हा लहानपणापासून माझ्या अम्माने मला सांगितलेल्या अनेक गोष्टींनी माझ्या मनात गर्दी केली. माझी आई उत्कृष्ट कथाकार आणि नकलाकार आहे. ती तुम्हाला तासन् तास खुर्चीवर खिळवून ठेऊ शकते. तिच्या गोष्टी कधी संपतच नाहीत. त्या ऐकताना हसून हसून तुमच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागते.

माझ्या या मताशी सहमत होणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. पण या सर्वांतून माझ्या मनात एक अनुभव अगदी ताजा राहिला आहे. तो म्हणजे जेव्हा तिने मला प्रथमच मृत्यू या संकल्पनेची ओळख करून दिली. ही गोष्ट कदाचित इतरांच्या मनात भयानक भावना निर्माण करू शकते. पण लहानपणी आपण प्रथम केव्हा मृत्यू या संकल्पनेबद्दल ऐकलं, हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल. मृत्यूच्या संकल्पनेबरोबरच आपल्या मनात भीती या संकल्पनेचाही जन्म होत असतो. माझे बाबा मला सोडून गेले, तो काळ मला स्पष्टपणे आठवतो. एक लहान मूल म्हणून त्यांचा मृत्यू हा मला गोंधळात टाकणारा होता.

त्यावेळी त्यांच्या मृत्यूची बातमी सहा वर्षांच्या एका मुलीला सांगताना अम्मा म्हणाली, “आपल्यात वावरणारी काही माणसं ही परमेश्वराची मुलं असतात. ती खास आणि सुंदर असतात. त्यांना आपल्यासाठी एक भेट म्हणून देवाने पाठविलेलं असतं. पण देवालाच जेव्हा एकाकी वाटतं, तेव्हा तो या मुलांना आपल्याकडे बोलावून घेतो. कारण त्याला त्या मुलांचा सहवास हवा असतो. त्यामुळे अशा सुंदर मुलांचा जो काही थोडाफार सहवास आपल्याला लाभला, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानायला हवेत. आपण त्यांचं स्मरण करून त्यांचा सहवास साजरा केला पाहिजे.”

आता जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा तिने मला मृत्यूबद्दल किती सहजतेने समजावलं, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटतं. मला नेमकं काय ऐकायचं आहे, हे तिला कसं समजलं? तिने सांगितलेली ती केवळ एक कथा नव्हती, तर ती माझ्या मनाची घडण करत होती. ही घडण कशी झाली, त्याचा मी आजही शोध घेत असते. आई ही एक जादुगार असते. मला असं जीवन दिल्याबद्दल आणि त्यात तुझी जादू जोडल्याबद्दल मी तुझे आभार मानते, अम्मा! आय लव्ह यू. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”, अशी पोस्ट सखी गोखलने केली आहे.

आणखी वाचा : “एसी नाही, प्रचंड उकाडा, रसिकांचा राग आणि…” नाट्यगृहांतील गैरसोयीबाबत वैभव मांगलेंचा संताप, म्हणाले, “कुठे दाद मागावी?”

दरम्यान सखी गोखलने तिची आई शुभांगीकडून अनेक धडे शिकले आहेत. सखी गोखले ही तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहत ती विविध तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहते. तिचे तिच्या आईशी म्हणजे अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्याबरोबर तिचं खास नातं आहे. ती बऱ्याचदा तिच्या आईबद्दल तिला वाटणारं प्रेम हटके शब्दात व्यक्त करत असते.

Story img Loader