छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून समृद्धी केळकरला ओळखले जाते. ‘फुलाला सुंगध मातीचा’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने ‘किर्ती’ हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. नुकतंच समृद्धी तिच्या आईच्या आठवणीत भावूक झाली.
समृद्धीने नुकतंच ‘राजश्री मराठी’च्या नवरात्रोत्सव विशेष भागात हजेरी लावली. यावेळी तिने दिलेल्या मुलाखतीत तिच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आईबद्दल बोलताना ती भावूक झाली.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
“लहानपणापासूनच आतापर्यंत मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबामुळेच आहे. यात बाबा, आई, ताई या सर्वांनी मला मोठा पाठिंबा दिला. मध्यंतरी जेव्हा आई गेली, तेव्हा मी पूर्णपणे ढासळले. तेव्हा मला काय करायचं, काहीही कळत नव्हतं. पण ती कुठे तरी आहे, हे मला माहिती होतं. ती आताही कुठेतरी माझ्याबरोबर आहे. त्यामुळेच मी इतक्या खंबीररित्या उभी आहे. बाबा, ताई हे दोघेही आहेत. त्याबरोबरच आपली देवी ही आहे.
त्यामुळे मी कायमच मला स्वत:ला प्रेरणा देत असते. आपली माणसं कुठेही गेलेली नाहीत, हे मी स्वतला समजावून सांगत असते. आई, आजी, मावशी ही माणसं कायम माझ्याबरोबर आहेत. ज्यांनी मला लहानपणापासून तू काहीही कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असं सांगितलंय. या तिघीही माझ्या आयुष्यातील देवी आहेत. मी खूप रागीट आहे. त्यामुळे आईने कायम मला रागावर नियंत्रण ठेवायला शिक. तुला पुढे जायचं असेल, तर रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, हे ती वारंवार सांगायची”, असे समृद्धी केळकरने म्हटले.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”
दरम्यान समृद्धी केळकरच्या आईचे निधन २०१५ मध्ये झालं होतं. त्यावेळी तिची आई आजारी होती. समृद्धीने २०१५ मध्ये ऑडिशन देण्यास सुरुवात केली. तिला ‘पुढचं पाऊल’ व ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर लावणीवर आधारित असलेल्या ‘ढोलकीच्या तालावर’ या डान्स शोमध्येही ती सहभागी झाले. यानंतर ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली. यानंतर ती ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत झळकली.