समृद्धी केळकर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून समृद्धी घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने किर्ती ही व्यक्तिरेखा साकारली होती. समृद्धीची ‘दोन कटिंग’ ही वेब फिल्मही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या वेब फिल्ममध्ये समृद्धी व अक्षय केळकर मुख्य भूमिकेत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दोन कटिंग’चा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब फिल्मचा तिसरा भाग अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘दोन कटिंग ३’च्या निमित्ताने समृद्धी व अक्षयने रोडिओ मिरचीला मुलाखत दिली. या मुलाखतीत समृद्धीला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. लग्नासाठी कसा मुलगा हवाय? असा प्रश्न तिला विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर देताना समृद्धीने तिच्या अपेक्षांचा पाढाच वाचला.

लग्नासाठी असलेल्या अटींची लिस्ट सांगत समृद्धी म्हणाली, “मला कोणत्याही क्षेत्रातील मुलगा चालेल. फक्त तो विश्वासू आणि माझ्यावर प्रेम करणारा असावा. मुंबईत राहणारा असावा. तो डॉग लव्हर पाहिजे आणि त्याचं कुत्र्यांवर प्रेम असलं पाहिजे. कारण, मला घरी बाबांनी कुत्रा पाळून दिला नाही. त्यामुळे त्याच्याकडे असेल तर मला छान वाटेल.”

हेही वाचा>> Video : काँग्रेस आमदाराच्या पार्टीत कोल्हापुरी घालून पोहोचला एमसी स्टॅन, नेटकरी म्हणाले, “८० हजारांचे शूज…”

समृद्धीच्या या उत्तरावर अक्षय म्हणाला, “आता मुलांनी त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्याबरोबर फोटो पाठवा.” यानंतर मुलाखतीत एकच हशा पिकला. समृद्धीने लग्नासाठी मुलाकडून असलेल्या आणखी एक-दोन अपेक्षा सांगितल्या. “मुलाला कलेची जाण असली पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम, डान्स व गाण्याचे कार्यक्रम हे एन्जॉय करता आलं पाहिजे. मी काय करते, कोणत्या क्षेत्रात काम करते, हे तरी त्याला माहीत असावं,” असंही पुढे समृद्धीने सांगितलं.

हेही वाचा>> Video : …अन् जादुगराने श्रेया बुगडेला गायबच केलं, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली “माझ्या नवऱ्याला…”

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली समृद्धी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या समृद्धी ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्स’चा या शोचं सूत्रसंचालन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress samruddhi kelkar talk about marriage shared thoughts on her future husband kak