मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. काही दिया परदेस या मालिकेतून सायली ही घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच सायली ही एक ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हर हर महादेव या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. नुकतंच सायली ही झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केले.

चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आयपीएलच्या सामन्यादरम्यान अनेकांनी ऋतुराजच्या खेळावरुन सायलीच्या पोस्टवर कमेंट केल्या होत्या. त्यामुळे त्या दोघांचे अफेअर असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल त्या दोघांनीही भाष्य केले नव्हते. मात्र नुकतंच बस बाई बस या कार्यक्रमावेळी सायली संजीवने यावर मौन सोडले.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
sunny deol bobby deol live
सनी देओल व बॉबी देओल यांची LIVE मुलाखत, वैयक्तिक आयुष्य, फिल्मी करिअर अन् बरंच काही!

बस बाई बस या कार्यक्रमातील महिलांनी सायलीला ऋतुराजबद्दल प्रश्न विचारला. यावेळी सायलीबरोबर अभिनेता शरद केळकरही सहभागी झाला होता. सायलीला ऋतुराजबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर शरदने तिची गंमत केली. ‘जर तो तुझा मित्र असेल तर प्लीझ मला त्याच्याकडून एक बॅट हवी हा… माझ्यासाठी एक बॅट मागून घे’ असे तिला गंमतीत म्हटले. त्यावर तिने ‘मी तुम्हाला बॅट मिळवून देऊ शकते’, असे म्हटले. त्यानंतर या प्रश्नाचे तिने सविस्तर उत्तर दिले. ‘मी आणि तो फार चांगले मित्र आहोत’, असे सायली म्हणाली.

“खरं सांगायचं तर आयपीएल खेळणाऱ्यांपैकी दोन-तीन माझे चांगले मित्र आहेत. त्यातील एक रॉयल चॅलेंजर बँगलोर, ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्ज, तुषार देशपांडे हा पण चेन्नई सुपरकिंग्ज मध्ये आहे. हे सर्वजण माझे खरंच खूप चांगले मित्र आहेत. त्यांना माझी काही दिया परदेस ही मालिका फार आवडायची. ते ती मालिका बघायचे. मला ही गोष्ट कळल्यानंतर मी जरा थक्कच झाली. क्रिकेटपटू ही मालिका का बघतात हेच मला कळत नव्हते. एकतर ते तिघेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत”, असे सायली संजीव म्हणाली.

आणखी वाचा : “प्रत्येक घाटात मला हा भास होतो…”, आदिनाथ कोठारेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान सायली आणि ऋतुराजच्या अफेअरच्या चर्चा गेल्या आयपीएलपासून रंगल्या आहेत ऋतुराजने सायलीच्या वनपीस घातलेल्या फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. ऋतुराजने तिच्या त्या फोटोवर वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते. त्यावर सायलीनेही हार्ट इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय दिला होता. त्यानंतरच त्यांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आले होते.

Story img Loader