अभिनेत्री सायली संजीव छोट्या पडद्यावरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून घराघरात  पोहोचली. अल्पावधीतच सायलीने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मालिकांप्रमाणेच सायलीने चित्रपटातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आता सायली ‘हर हर महादेव’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता तिने नुकतीच ‘बस बाई बस’ शोमध्ये हजेरी लावली.

‘बस बाई बस’ या शोमध्ये अभिनेता सुबोध भावे इतर महिलांसह कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलेला बोलतं करतो. सायलीने या शोमध्ये विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. अनेक गमतीशीर किस्सेही सायलीने यावेळी सांगितले. या शोमध्ये तिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान भेटीचा किस्साही सांगितला. कार्यक्रमातील एका महिलेने सायलीला “प्रत्येक महिलेची अशी इच्छा असते की शाहरुखला भेटावं. शाहरुखने तुझा हात हातात घेऊन गप्पा मारल्या. हे कसं काय शक्य झालं?”, असा प्रश्न विचारला.

PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”
nana patekar
‘एखादा सिनेमा गेला त्याची खंत नाही का?’ नाना पाटेकर म्हणाले, “खूप रोल गेले त्यात माझा…”

हेही वाचा >> “लग्न कधी करणार?”, चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर यामी गौतमचं भन्नाट उत्तर, पतीबरोबरचा फोटो पोस्ट करत म्हणाली…

हेही वाचा >> ‘बिग बॉस’च्या घरात योगेशला रडताना पाहून सुरेखा कुडची संतापल्या, अपूर्वाचं नाव न घेता म्हणाल्या “कॅप्टन रुमवर ताबा…”

कार्यक्रमातील महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना सायलीने शाहरुख खान भेटीचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न आणि रिसेप्शन झाल्यानंतर मी तिथून निघण्याच्या तयारीत होते. पण हॉटेलमधील सगळ्या लिफ्ट बंद करुन ठेवल्या होत्या. त्यामुळे मी तिथेच अडकून पडले होते. याचा विचार करत असतानाचा एक व्यक्ती माझ्या डोळ्यासमोरुन आत गेली. तो शाहरुख खान होता. मी वेड्यासारखी बघत उभे होते. माझ्या मित्राला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटून शाहरुख बाहेर आला. माझ्या मित्राने त्याला माझी ओळख करुन दिली. त्यानंतर माझा हात हातात घेऊन तो बोलत होता. पण मी नुसतेच शाहरुखकडे पाहत होते. तो काय बोलला, यातलं मला एक अक्षरही आठवत नाही. पण कोणीतरी हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले. आणि याचे सगळे फोटो माझ्याकडे आहेत”.

हेही वाचा >> Teaser : ‘दगडी चाळ’नंतर अकुंश चौधरी ‘ऑटोग्राफ’मधून प्रेक्षकांच्या भेटीला, एकाचवेळी तीन अभिनेत्रींसह पडद्यावर झळकणार

सायलीसह अभिनेता शरद केळकर आणि हार्दिक जोशीनेही ‘बस बाई बस’ शोमध्ये हजेरी लावली. ‘हर हर महादेव’ चित्रपटात सायली महाराणी सईबाई भोसले यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सायली पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तेलुगु, तमिळ आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये दिवाळीच्या मुहुर्तावर येत्या २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader