कलाविश्वात एखादी भूमिका साकारण्याआधी प्रत्येकाला ऑडिशनच्या प्रक्रियेतून जावं लागतं. परंतु, हल्लीच्या काळात ऑडिशनचे निकष काहीसे बदलले आहेत असा दावा एका लोकप्रिय अभिनेत्रीने केला आहे. आधी केवळ अभिनय, भूमिकेची आवश्यकता पाहून एखाद्या कलाकाराची निवड केली जायची. परंतु, आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. सोशल मीडियावर फॉलोवर्सचा आकडा किती आहे? या बद्दलची विचारणा अनेकदा ऑडिशनमध्ये केली जाते. गेल्या काही दिवसांत बऱ्याच कलाकारांना असा अनुभव आला. यासंदर्भात मराठी मालिकाविश्वातील एका अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत आपली खंत व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ग्रहण’, ‘छत्रीवाली’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, ‘संत गजानन शेगावीचे’ अशा अनेक मालिकांमधून अभिनेत्री रुपाली गायखे नावारुपाला आली. गेली अनेक वर्षे ती या इंडस्ट्रीत कार्यरत आहे. छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु, एवढी वर्षे काम करूनही नुकत्याच दिलेल्या एका ऑडिशनमध्ये रुपालीला धक्कादायक अनुभव आला.

हेही वाचा : आलिया भट्ट : नेपोटिझमचा ठपका पुसून ट्रोलर्सना हसतमुखाने सामोरी जाणारी बहुरंगी अभिनेत्री

रुपाली व्हिडीओ शेअर करत लिहिते, “नमस्कार, आज तुम्हा सर्वांना मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की, गेल्या अनेक वर्षांपासून मी इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. पण, इन्स्टाग्राम, फेसबुक, एक्स या सगळ्या समाजमाध्यमांवर मी जास्त सक्रिय नसते. मला एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर यायचं होतं. आता सगळंच उलटं झालं. आज मी एका मीटिंगला गेले असताना मला समोरच्या लोकांनी तुमचे इन्स्टाग्राम फॉलोवर्स किती आहेत? असा प्रश्न विचारला. अर्थात मी या समाजमाध्यमांवर सक्रिय नसल्याने माझे इन्स्टाग्राम फॉलोवर्स जास्त नव्हते. मी जास्त पोस्ट, रील्स व्हिडीओ शेअर करत नाही. माझे जेमतेम २ हजार वगैरे फॉलोवर्स आहेत असं मी त्यांना सांगितलं.”

हेही वाचा : फुफ्फुसाला जखम, थकवा, एके दिवशी शुद्ध हरपली अन्…; विद्याधर जोशींना झालेला जीवघेणा आजार, म्हणाले…

रुपाली पुढे म्हणते, “आज जवळपास मी १३ ते १४ वर्षे इंडस्ट्रीत काम केलं आहे. पण, शेवटी इन्स्टाग्रामच्या फॉलोवर्सवर तुम्हाला काम मिळणार की नाही हे ठरतं. या गोष्टी मला आधीच माहिती असत्या, तर सुरुवातीपासून काम न करता सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत बसले असते. मला याबाबतीत कोणालाही वाईट बोलायचं किंवा ठरवायचं नाही. जे लोक आज सोशल मीडियावर लोकप्रिय आहे ते सुद्धा प्रचंड मेहनत करतात याची कल्पना मला आहे. पण, मला फक्त प्रेक्षकांना एकच गोष्ट विचारायची आहे ती म्हणजे कलाकारांचे मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्राम फॉलोवर्स असणं ही गोष्ट इंडस्ट्रीत काम करण्यासाठी महत्त्वाची आहे का?”

“आता मी माझ्या चाहत्यांनाच एक प्रश्न विचारेन तो म्हणजे, मी १३ ते १४ वर्षे जे काम केलंय त्या आधारे मला काम मिळालं पाहिजे की, माझे इन्स्टाग्राम फॉलोवर्स पाहिले पाहिजेत?” असा सवाल उपस्थित करत अभिनेत्रीने घडल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली आहे. दरम्यान, रुपालीच्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांपासून अनेक नेटकऱ्यांनी घडल्याप्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.