छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शर्मिष्ठा राऊतला ओळखले जाते. बिग बॉस मराठीमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. तिने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटात काम करत तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. शर्मिष्ठाने करोना लॉकडाऊन काळात तेजस देसाईबरोबर लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शर्मिष्ठा राऊत ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. नुकतंच शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत शर्मिष्ठा आणि तिचा पती तेजस हा गोव्यातील एका रस्त्यावर बसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओला तिने रोमँटिक कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

” यार तो मिला अरे प्यार कर ले”..आज आपल्या लग्नाला ३ वर्ष झाली.. आपल्यात मैत्रीच नात निर्माण झालं होत आणि आजही ते तसंच टिकून आहे दिवसेंदिवस आपली मैत्री घट्ट होत जातेय. प्रेम वाढतय…प्रेमात कायम एकमेकांचा हात धरून एकमेकांना aim देऊन, एकमेकांची स्वप्न पूर्ण करू, एकमेकांना समजून घेऊ अस वाटायच थँक्स टू स्वामी कि त्यांनी मला ह्याच विचारसरणीचा माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा नवऱ्याच्या रुपातला मित्र दिला..

थँक्यू तेजस माझ्या आयुष्यात आलास, मला स्वीकारलस, माझ्या चिकूचा बाबा झालास, माझ्या माणसांना आपलस केलस happy anniversary my love…तेजस देसाई. दरवर्षी मी Thankuuu म्हणेन खर तर रोजच म्हणायला हव @sups7188 @niranjanpatankar88 @kalpak13 तेजसला माझ्या आयुष्यात आणल्या बद्दल…, असे शर्मिष्ठा राऊतने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात तुझी निवड कशी झाली? प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली “सुरुवातीला कठीण…”

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतने २०२० मध्ये तेजस देसाईशी लग्नगाठ बांधली. शर्मिष्ठा आणि तेजस यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शर्मिष्ठाने काही दिवसांपूर्वी निर्माती म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. ती आणि तिचा नवरा तेजस यांनी मिळून नवं प्रोडक्शन हाऊस सुरु केलं. सध्या ती तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे.