यंदाचा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळ्याला मराठीसह अनेक हिंदी कलाकारांनीही हजेरी लावली. त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच आता मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडे आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखले जाते. श्रेयाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रेया ही झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यासाठी तयार होताना दिसत आहे. त्याचवेळी मलायका ही समोरुन चालत येते.
आणखी वाचा : “मी फक्त आडनावाने शेठ आहे…”, श्रेया बुगडेचे स्पष्ट वक्तव्य, म्हणाली “आमच्याकडे गुजराती…”

मलायकाने या पुरस्कार सोहळ्यासाठी सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती. त्याबरोबर तिने त्यावर मॅचिंग कानातले आणि बांगड्याही घातल्या होत्या. यावेळी ती फारच सुंदर दिसत होती. यावेळी मलायकाही पुरस्कार सोहळ्यासाठी जात असताना तिची आणि श्रेया बुगडेची नजरानजर होते. श्रेया व्हॅनिटी व्हॅनबाहेर उभी राहून तयार होताना दिसत आहे. यावेळी मलायका तिला पाहते आणि हाय हॅलो करते. श्रेयाही मलायकाकडे पाहून हसते आणि मान डोलवते.

श्रेयाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “जेव्हा मलायका अरोरा तुम्हाला हॅलो म्हणते. कालची रात्र खूप भारी होती. ती किती छान आहे”, असे श्रेयाने या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटले आहे.

श्रेया बुगडेची पोस्ट

आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

दरम्यान यंदाचा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळा नुकताच रंगला. या पुरस्कार सोहळ्याला मराठी कलाकारांसह माधुरी दिक्षीत, मलायका अरोरा यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sherya bugde share malaika arora video during zee marathi award 2023 nrp