शितल क्षीरसागर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून ती घराघरात पोहोचली. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या शीतल ‘रमा राघव’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शीतल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
शीतलने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवरुन दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील पहिल्या व्हिडीओमध्ये शीतल भाकऱ्या थापताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने शीतल चुलीवर भाकऱ्या भाजत आहे. या पोस्टला तिने “चुलीवरची तांदळाची भाकरी…जाणकारांच्या सानिध्यात तुम्ही असलात की सगळं काही शक्य आहे,” असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा>> रीलवर ट्रेंडिंग ‘बहरला हा मधुमास’ची गायिका कोण माहितीये का? प्रसिद्ध बॉलिवूड गायिकेने गायलं आहे गाणं
शीतलचा हा व्हिडीओ चाहत्यांचाही पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. शीतलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.