छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत असतात. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. नुकतंच शिवालीच्या एका रील व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

शिवाली परब ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. शिवालीने नुकतंच एका बॉलिवूड गाण्यावर रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “जेवढा पैसा-प्रसिद्धी जास्त…” शिवाली परबच्या नव्या लूकवर चाहते नाराज, म्हणाले “तू साधीच…”

“कुठे आहेस रे बाबा ? – ह्या उडत्या केसांचं रहस्य आमच्या सेटवरचा तुफानी पंखा आहे”, असे कॅप्शन शिवाली परबने दिले आहे. शिवालीच्या या पोस्टवर अभिनेता पृथ्वीक परबने कमेंट केली आहे.

तो येतच होता… तेवढ्यात ते मागचं पोस्टर पाहिलं, अशी प्रतिक्रिया पृथ्वीक परबने केली आहे. पृथ्वीकची ही कमेंट सध्या व्हायरल होत आहे.

shivali parab
शिवाली परबच्या पोस्टवरील कमेंट

आणखी वाचा : “मला अमेय खोपकरांनी फोनवरुन धमकी दिली”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट, म्हणाले “मी कुशलला…”

दरम्यान शिवाली परब ही उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवत असते. काही दिवसांपूर्वी शिवालीचं ‘पायल वाजे’ हे गाणं प्रदर्शित झालं. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.

Story img Loader