यंदाचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अटीतटीचा होताना पाहायला मिळत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगत असलेला हा सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. तर काही मालिकेचे कलाकार शूटींगदरम्यान वेळ काढत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे.

अभिनेत्री शिवानी रांगोळने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील कलाकार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहताना दिसत आहे.
आणखी वाचा : “बहिणीची काळजी घे…”, अभिषेक देशमुखने कानपिळीदरम्यान प्रसादला बजावले, उत्तर देताना अभिनेता म्हणाला “तू जितकी…”

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

यावेळी या मालिकेतील सर्वच कलाकार मोबाईलवर या सामन्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर वेफर्सचे काही पॅकेटही दिसत आहेत. यावेळी सर्वजण टाळ्या वाजवत आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहेत.

“Lots of love from team तुला शिकवीन चांगलाच धडा to team India!!! भुवनेश्वरी मॅडम म्हणतात तसं, “जा! जग जिंकून या!!!”, असे कॅप्शन शिवानी रांगाळेने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : टीम इंडियाच्या विजयासाठी प्राजक्ता माळीचे गणपती बाप्पाला साकडं, म्हणाली “आजची मॅच…”

दरम्यान आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. यजमान भारताविरुद्ध लढतीत ५ वेळ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.