‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. नुकतंच अधिपती आणि अक्षराच्या लग्नाचा सोहळा पार पडला. त्यानंतर आता या कार्यक्रमातील कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री शिवानी रांगोळेने एक सुंदर कविता सादर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री शिवानी रांगोळेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या संपूर्ण टीमचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यासोबतच तिने या कार्यक्रमातील एक व्हिडीओही शेअर केला आहे. या कार्यक्रमात शिवानीचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. यावेळी शिवानीने एक कविता सादर केली.
आणखी वाचा : दादा कोंडकेंच्या आठवणींना मिळणार उजाळा, तीन गाजलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

शिवानी रांगोळेने सादर केलेली कविता

“वाट आता वेगळी आहे, पावलांना सांगायचे आहे
नको रमूस आता त्याच वळणावर
उरातली धडधड गिळून टाक,
नजरेला नजर नको पुन्हा
नको तो मनाचा खेळ नवा,
चहाच्या वाफेत उडून गेली वेळ
घोट घेत राहिलो शांततेचे
शेवटी उसासे ठरले बोलके
घेऊन जाशील सगळे माझे,
श्वास तेवढा ठेवून जा
शब्दांचे ओझे तेवढे कर हलके,
मागे वळून पाहशील मला
मी धुक्यात विलीन असेन
माझ्या मनातही मी एकटा असेन
निरोप देताना उशीर करु नकोस,
चुकून पाहशील डोळ्यात माझ्या
त्या चकव्याला भुलू नकोस…!!

आणखी वाचा : Video : भरधाव वेगाने ओव्हरटेक, ट्रक पलटी अन् फेरारी कार…; ‘स्वदेस’ फेम अभिनेत्रीच्या कार अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर

शिवानी रांगोळेने या पोस्टला हटके कॅप्शन दिले आहे. “माझी कविता चला हवा येऊ द्या च्या मंचावर सादर करायची ही दुसरी वेळ! हा योग नेहमीच जुळून येतो ह्याचा खूप आनंद आहे! ह्यावेळी तुझ्या challenge मुळे ते झालं, त्यामुळे ऋषिकेश शेलार तुला धन्यवाद”, असे कॅप्शन तिने दिले आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान शिवानी रांगोळे ही अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम कविताही करते. काही महिन्यांपूर्वी तिचे रेन, कॉफी अँड टूमारो नावाचे पुस्तक प्रदर्शित झाले. या पुस्तकात तिने लिहिलेल्या अनेक कविता प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ चित्रपटात ती झळकली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress shivani rangole present poem at chala hawa yeu dya show nrp