Shivani Sonar and Ambar Ganpule Engagement: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांचा साखरपुडा, लग्न झालं. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान झाले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सिंधुताई माझी माई’मधील अभिनेत्री शिवानी सोनारने गुपचूप साखरपुडा उरकला. ‘रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’ या मालिकेतील झळकलेला अभिनेता अंबर गणपुले याच्याशी शिवानीचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांचा सुखद धक्का बसला. अशातच आज शिवानी व अंबरच्या साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

‘द रील फार्म’ या इन्स्टाग्राम पेजवर शिवानी सोनार व अंबर गणपुलेच्या साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, दोघांचं फोटोशूट, डान्स, केक कटिंग, अंगठी घालणे हे सर्व काही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या शेवटची शिवानी व अंबरच्या कुटुंबाचा छान फोटो आहे.

jahnavi sister in law sandhya killekar post about riteish deshmukh banned her from bhaucha dhakka
“जान्हवीसाठी हे खूप Unfair…”, भाऊच्या धक्क्यावर बसू न दिल्याने अभिनेत्रीच्या जाऊबाईंची पोस्ट; संध्या किल्लेकर म्हणाल्या…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Proud father daughter selected in police as a PSI emotional video goes viral on social media
“संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो” लेक पोलीस झाल्याचं कळताच वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला; भररस्त्यातला VIDEO व्हायरल
The amazing dance of the little one hanging on the safety rope
आरारा खतरनाक! ‘हा आनंदच वेगळा…’; सेफ्टी रोपवर लटकणाऱ्या चिमुकल्याचा जबरदस्त डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक
Bigg Boss Marathi 5
Video: मानकाप्याच्या गुहेत घन:श्यामची एन्ट्री; गोंधळलेल्या छोट्या पुढारीला बिग बॉस म्हणाले, “मान वळवायला…”
cat's stunning expression on the marathi song
‘आप्पांचा विषय लय हार्ड…’ गाण्यावर बोक्याचे जबरदस्त एक्स्प्रेशन; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “पासवर्ड म्याव म्याव…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: बहिणी देणार सूर्याला आश्चर्याचा धक्का! ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा पाहा नवीन प्रोमो
Two lions trying to attack a dog running with the speed
थरारक! वाऱ्याच्या वेगाने धावून दोन सिंहांचा श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे असं काही घडलं…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

हेही वाचा – Video: डोळ्यात काजल, कपाळावर काळा टिळा, आमिर खान लेक जुनैद खान दिसला वेगळ्याच रुपात; म्हणाला, “भाई लोक…”

साखरपुड्यात शिवानी व अंबरने दोन लूक केले होते. विधीसाठी शिवानीने शेवाळी रंगाची साडी नेसली होती. तर अंबरने पांढऱ्या कुर्त्यावर शिवानीला मॅचिंग करण्यासाठी शेवाळी रंगाच जॅकेट परिधान केलं होतं. तसंच त्यानंतर अंगठी घालण्याच्या कार्यक्रमासाठी दोघं वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाले. शिवानी पांढऱ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यात दिसली. तर अंबरने निळ्या रंगाची नवाबी परिधान केली होती. साखरपुड्यात शिवानी व अंबर खूपच सुंदर दिसत होते.

हेही वाचा – अदा शर्माच्या आवाजात स्वतःने गायलेलं भक्तीगीत ऐकून भारावला प्रथमेश लघाटे, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, शिवानी व अंबरच्या साखरपुड्याचे फोटो अजूनही चर्चेत आहेत. कलाकार मंडळींसह चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरुच आहे. आता दोघं कधी लग्नबंधनात अडकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.