अभिनेत्री श्रुती मराठे व तिचा पती, अभिनेता गौरव घाटणेकर यांची निर्मिती असलेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ऑगस्ट २०२२मध्ये सुरू झाली होती. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील आनंदी, रमा, राघव, सुलक्षणा, वर्षा, रेवा अशी अनेक पात्र घराघरात पोहोचली. नवनवीन ट्विस्टमुळे मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रिय वाढत होती. एवढंच नव्हे तर श्रुती मराठेच्या या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला होता. पण कालांतराने मालिकेची सतत वेळ बदल्यात आली आणि अखेर १६व्या महिन्यात मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेच्या यशानंतर अभिनेत्री श्रुती मराठे आता नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला. आता ही नवी मालिका कधीपासून कोणत्या वेळेत पाहायला मिळणार हे समोर आलं आहे.

हेही वाचा – ‘हीरामंडी’चा दुसरा सीझन येणार की नाही? संजय लीला भन्साळींच्या ‘या’ वक्तव्यातून झाला खुलासा, म्हणाले…

श्रुतीच्या नव्या मालिकेचं नाव ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ असं आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ही नवीन मालिका १० जूनपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ नव्या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे व अभिनेता आनंद अलकुंटे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – Video: “नातेवाईकांना पैसे दिले म्हणजे जबाबदारी घेतली असं होत नाही,” घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून संतापला शशांक केतकर, म्हणाला…

दरम्यान, सध्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘राणी मी होणार’ ही मालिका रात्री ८ वाजता सुरू आहे. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. वर्षही पूर्ण न होता अभिनेता सिद्धार्थ खिरीड व अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांची प्रमुख असलेली ‘राणी मी होणार’ ही मालिका ऑफ एअर होणार आहे. २१ ऑगस्ट २०२३ पासून ही मालिका सुरू झाली होती. पण आता वाहिनीने बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. याआधी ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’ ही मालिका अचानक बंद करण्यात आली होती. अवघ्या तीन महिन्यात या मालिकेचा गाशा गुंडाळला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress shruti marathe new serial bhumikanya coming soon pps
Show comments