छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीतील एक मालिका म्हणजे मन झालं बाजिंद. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. श्वेताने नुकतंच एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कमेंटवर तिने प्रतिक्रिया दिली आहे.

श्वेताने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर साडी नेसलेला एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा : “एकनाथ शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…” मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “चार हात, दोन फोन, एक नाथ…”

a young girl wanted to marry with a farmer
Video : “लग्न करणार तर फक्त शेतकऱ्याशी…”, तरुणीने स्पष्टचं सांगितलं; नेटकरी म्हणाले, “शेतकऱ्याचे चांगले दिवस आले..”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Ishika Taneja takes diksha left showbiz mahakumbh 2025
प्रसिद्ध अभिनेत्रीने कुंभमेळ्यात घेतली दीक्षा, ३० व्या वर्षी ग्लॅमरविश्व सोडले; म्हणाली, “स्त्रिया लहान कपडे घालून नाचायला…”
Natalie Winters Dress Controversy
Natalie Winters Dress Controversy : व्हाईट हाऊस प्रतिनिधीच्या स्वेटरवरून वाद… महिला पत्रकारानं दिलं प्रत्युत्तर; म्हणाली, “माफ करा? द्वेष करणारे…”
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
mamta kulkarni first post after being expelled from kinnar akhara
किन्नर आखाड्यातून हकालपट्टी झाल्यावर ममता कुलकर्णीने केली पहिली पोस्ट
Loksatta viva Fashion and Statement Influencers Presidential Inauguration
फॅशन आणि ‘स्टेटमेंट’
Yoga Centre Descent Into Sex Cult Woman Told The Story
Sex Racket : १००० कुमारिकांशी शय्यासोबत करण्याची भोंदू योग गुरूची मनिषा; सेक्स रॅकेट उघड

श्वेताच्या या पोस्टवर एका महिलेने कमेंट केली आहे. “अजून खाली नेस बाई”, अशी कमेंट केली आहे. त्यावर श्वेताने प्रतिक्रिया दिली आहे. “नको काकू ती तुमची स्पेशालिटी आहे, तुम्हीच नेसा. आय लव्ह यू काकू”, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

shweta rajan 3
श्वेता राजनची कमेंट

तर एकाने तिच्या या पोस्टवर अश्लील कमेंट केली आहे. “काही दिवसांनी असे लोक तर रस्त्यावर सेक्स करतील लोकांसमोर”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना श्वेता म्हणाली, “तुमच्यासारखे म्हणायचं का तुम्हाला? कारण तुमच्या सारख्या विचारसरणीची लोक १०० टक्के करतील No doubt! मला तुमच्या घरातील स्त्रियांबद्दल खूप वाईट वाटतंय आणि तुम्हाला लहान मुलगी सुद्धा आहे. सर जरा तिच्यासाठी तरी सुधारा. तिला मोठं झाल्यावर वडील म्हणायची लाज वाटू नये याची काळजी घ्या”, असे तिने यात म्हटले आहे.

shweta rajan
श्वेता राजनची कमेंट

श्वेताला ट्रोल करणाऱ्यांवर तिचा सहकलाकार असलेल्या वैभव चव्हाणने देखील टीका केली. “अगं केसात काकूंसारखं एक फूल लावलं असत तर त्यांना नक्कीच आवडला असता फोटो.. सुंदर दिसते आहेस तू…काकू जरा जळत आहेत बाकी काही नाही.” असे वैभव चव्हाणने म्हटले आहे.

आणखी वाचा : “पुढच्या ६ महिन्यात कोणत्याही नाट्यगृहाची एसी यंत्रणा बंद पडणार नाही”, वैभव मांगलेंच्या ‘त्या’ पोस्टवर प्रशांत दामलेंची प्रतिक्रिया

दरम्यान श्वेता आणि वैभव यांनी झी टीव्हीवरून प्रसारित झालेल्या ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. काही दिवसांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

Story img Loader