छोटा पडदा किंवा मालिका विश्वातील अनेक कलाकार हे कायमच चर्चेत असतात. झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. याच मालिकेत रेवती हे पात्र साकरणारी अभिनेत्री श्वेता मेहेंदळेने एका वेगळ्याच कारणाने आता चर्चेत आली आहे. नुकतंच श्वेता मेहेंदळेने एका नेटकऱ्याला चांगलेच सुनावले आहे.

माझ्या नवऱ्याची बायको याच मालिकेतील अभिनेत्री श्वेता मेहेंदळे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिला फिरण्याची फार आवड आहे. विशेष म्हणजे श्वेता ही अनेकदा बाईक राईडही करते.
आणखी वाचा : आदेश बांदेकरांच्या लेकाचा गर्लफ्रेंडबद्दल खुलासा, म्हणाला “माझं आयुष्य…”

नुकतंच श्वेताने तिच्या कोकण दौऱ्याचे दोन ब्लॉग युट्यूबवर पोस्ट केले आहेत. तिच्या या ब्लॉगला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. मात्र या व्हिडीओवरील एका कमेंटला तिने सडेतोड उत्तर दिले आहे.

“इंग्रज भारतातून जाताना ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी आपली औलाद म्हणून सोडून गेली”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर श्वेताने “तुमचे हे विचार आहेत? आणि ही भाषा आहे?” असे म्हटले.

आणखी वाचा : Video : ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर भर चित्रपटगृहात स्त्रियांनी केलं असं काही…, मराठी अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली…

Shweta Mehendale comment
श्वेता मेहेंदळेची कमेंट

आणखी वाचा : “बोल्ड सीन करण्यापूर्वी नवऱ्याशी चर्चा करतेस का?” प्रिया बापट म्हणाली, “उमेशपेक्षा…”

त्याबरोबरच श्वेताने या कमेंटचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “माझ्या युट्यूब चॅनलवर मी केलेल्या ट्रॅव्हल व्लॉगवर आलेली ही प्रतिक्रिया”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. दरम्यान सध्या श्वेताची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

Story img Loader