मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. आज अभिनेत्री गौतमी देशपांडे हिचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर आता बरेच कलाकार मंडळी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. यामध्ये मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्रीचा देखील समावेश आहे. या अभिनेत्रीने नोव्हेंबर महिन्यात गुपचूप साखरपुडा उरकला होता. आता लवकरच ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असून आज तिच्या हातावर होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी काढली आहे. तिच्या मेहंदी समारंभाचा व्हिडीओ समोर आला आहे.
लग्नबंधनात अडकणारी ही मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनल पवार. सध्या ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ या मालिकेत झळकणाऱ्या सोनलची आयुष्याचा नवा प्रवास सुरू करण्यासाठी तयार झाली आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर स्वतःच्या मेहंदी समारंभाचा व्हिडीओ शेअर केला आहे. “असा कसा बाई मला तुझा रंग लागला”, असं लिहित आणि होणाऱ्या नवऱ्याला टॅग करत सोनलने मेहंदीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मेहंदीच्या समारंभासाठी सोनलने खास भगव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या हातावर आणि पायावर सुंदर मेहंदी काढली आहे. सोनलच्या मेहंदीमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव समीरसह, शिवनेरी बस, मस्तानी, मुंबई असं लिहिलेलं दिसत आहे. सोनलच्या मेहंदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. २८ डिसेंबरला ती समीर पालुष्टेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.
सोनलचा होणार नवरा समीर पालुष्टे कोण आहे?
सोनलचा होणारा नवरा समीर पालुष्टे हा एक व्यावसायिक आहे. तो स्पार्कल्स मीडियाचा फाऊंडर व सीईओ आहे. तसेच समीर डिजिटल मार्केटर व ब्रँड कन्सलटंट म्हणून काम करतो. विशेष म्हणजे सोनलच्या होणाऱ्या नवऱ्याला भारत सरकारच्या निवडणूक आयोगाकडून पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा – सविता मालपेकरांनी पहिल्यांदा दारुच्या ग्लासला हात लावला अन् त्यांना पाहून अशोक सराफ म्हणालेले…
दरम्यान, सोनलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘रमा राघव’ व्यतिरिक्त ‘तुला पाहते रे’, ‘घाडगे अॅण्ड सून’ या मालिकेमध्ये काम केलं आहे. तिची ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील रुपालीची भूमिका चांगलीच गाजली होती.