मराठी, हिंदी आणि आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत छाप उमटवणारी सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेत असते. सोनालीने आपल्या अभिनयाबरोबरच सुंदर नृत्याने, अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनालीला महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणून ओळखलं जातं. अशा या प्रसिद्ध अभिनेत्रीने लाडक्या बाप्पाच्या आगमनाची पूर्ण तयारी केली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही घरीच सोनालीने आपल्या हाताने गणरायाची सुंदर मूर्ती साकारली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“यंदाचा बाप्पा…आमचा गणोबा”, असं कॅप्शन लिहित सोनाली कुलकर्णीने गणरायाची मूर्ती तयार करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री भावाच्या ( अतुल कुलकर्णी ) मदतीने बाप्पाची मूर्ती तयार करताना दिसत आहे. शंकराची पिंड, त्यावर छोटासा गणपती बाप्पा आणि समोर उंदीर मामा अशी सुंदर मूर्ती सोनाली व तिच्या भावाने तयार केलेली पाहायला मिळत आहे. सोनालीच्या या सुंदर गणोबाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Sonalee Kulkarni Bappa

सोनाली व तिच्या भावाने साकारलेली गणरायची मूर्ती पाहून अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. “कल्पना खूप छान आहे”, “मूर्ती उत्तम आहे”, “गणपती खूप सुंदर बनवला आहे”, “यंदाची बाप्पाची मूर्ती खूप आकर्षक आणि सुबक आहे”, “सोनाली तुझ्या हातातली कला आणि कल्पना छान आहे”, “खूपच छान”, “अप्रतिम” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – “अप्सरा हो…”, ज्युनियर एनटीआरबरोबर जान्हवी कपूरचा जबरदस्त डान्स पाहून बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणाला…

दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या ( Sonalee Kulkarni ) कामाबद्दल बोलायचं झालं, तिचा सध्या ‘होऊ दे चर्चा…कार्यक्रम आहे घरचा!’ हा कार्यक्रम ‘सन मराठी’ वाहिनीवर सुरू आहे. रविवार रात्री १० वाजता हा कार्यक्रम प्रसारित होतं आहे. तसंच याचवर्षी सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली. २५ जानेवारीला सोनालीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. आता लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोनाली स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी या मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sonalee kulkarni made their own ganpati idol watch video pps