मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच तिच्या एका फोटोशूटवर अभिनेता कुशल बद्रिकेने कमेंट केली आहे.
सोनाली कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने छान निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती फारच सुंदर दिसत आहे. या फोटोत सोनाली ही आनंदात उड्या मारतानाही पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “‘बाई, बूब्स आणि ब्रा’ पोस्टनंतर मला एका लग्न झालेल्या पुरुषाने फोन केला अन्…” हेमांगी कवीने सांगितला ‘तो’ किस्सा
“मैंने अपने आँचल से आसमाँ पर बादल कोरें हैं, कोई शक़ हो गर तो इस नीले रंग से पूछ लेना”, असे हिंदी भाषेतील एक वाक्य तिने कॅप्शन म्हणून दिले आहे.
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोवर अभिनेता कुशल बद्रिकेने मजेशीर कमेंट केली आहे. ‘मुळात तुझे फोटो इतके भारी येतातच कसे? खूपच मस्त’, अशी कमेंट कुशल बद्रिकेने केली आहे.
आणखी वाचा : “…मगच लग्नाचा विचार करा”, मिलिंद गवळींचा मुलींना मोलाचा सल्ला, म्हणाले “बाप म्हणून…”
कुशलच्या या कमेंटवर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कारण त्या अप्सरा आहेत’, अशी कमेंट एकाने दिली आहे. तर एकाने तिचे ‘हे फोटो खरंच सुंदर आहेत. त्याबरोबरच तिला फोटोशूटसाठी पोज देण्याची योग्य समजही आहे, असे म्हटले आहे.