मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’ यांसारख्या अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून ती प्रसिद्धीझोतात आली. सोनाली कुलकर्णीने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे. आता सई ताम्हणकर आणि सोनालीच्या कमेंटची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
सोनाली कुलकर्णी ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. सोनाली कुलकर्णी आणि तिचा नवरा कुणाल बेनोडेकरने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दुबईत नवीन घर खरेदी केले आहे. तिने दिवाळीच्या दरम्यान तिच्या चाहत्यांबरोबर ही गुडन्यूज शेअर केली. त्यानंतर आता सोनालीच्या पोस्टवर सई ताम्हणकरने ‘क्यूटी’ अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा : “सालाबादप्रमाणे फराळ खाऊन…” प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
त्यावर आता सोनालीने “ते सर्व ठीक आहे, पण तू तुझ्या नवीन घरात कधी बोलवतेस ते सांग आधी” असे म्हटले आहे. त्यानंतर सईने त्यावर प्रतिक्रिया देत “तुमचं लंडन, दुबई झालं की सांगा मॅडम” असं म्हटलं आहे. त्यावर सोनाली “राहू दे, राहू दे” असं म्हणत कमेंट केली आहे.
आणखी वाचा : सोनाली कुलकर्णीने दुबईत खरेदी केलं नवीन घर, पाडव्याच्या मुहूर्तावर शेअर केले आलिशान घरातील फोटो
यावर सईने “हा काय आता”, असे म्हटले आहे. त्यावर सोनालीने आलेच अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर घेतल्याने अनेक कलाकार तिचे अभिनंदन करत आहेत.