मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत स्पृहा जोशी हे नाव कायमच पाहायला मिळते. उत्तम अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री, उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून तिला ओळखलं जातं. स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. सध्या ती लोकमान्य या मालिकेत झळकताना दिसत आहे. यानिमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
‘लोकमान्य’ ही मालिका लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत क्षितिज दाते पाहायला मिळत आहे. तर त्यांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका स्पृहा जोशी साकारत आहे.
आणखी वाचा : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्याच्या मनगटाचे हाड मोडले, अभिनेत्री म्हणाली “या माणसाने…”
‘लोकमान्य’ ही मालिका लवकरच १०० भाग पूर्ण करणार आहे, त्या निमित्ताने स्पृहाने एक पोस्ट शेअर केली आहे. “बघता बघता ‘लोकमान्य’चे १०० भाग या आठवड्यात पूर्ण होतील. २०२३ मध्ये माझ्या आयुष्यात घडलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे. प्रवास चालू राहीलच. त्यात हे सोबती मिळाले हा आनंद मोठा आहे’, असे स्पृहाने म्हटले आहे.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
स्पृहाने ही पोस्ट शेअर करताना खास फोटोही पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. तर काहींनी तिच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे.