स्पृहा जोशी हे नाव नेहमीच मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील असतं. उत्तम अभिनेत्री आणि संवेदनशील कवयित्री, उत्कृष्ट सूत्रसंचालिका म्हणून तिला ओळखलं जातं. स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. सध्या ती तिच्या ‘लोकमान्य’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. अशातच तिने तिच्या आयुष्याबद्दलचं एक गुपित उघड केलं आहे.

तिने नुकतीच ‘व्हायफळ’ या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने लहानपणीपासून तिला मिळत गेलेली शिकवण, तिच्या आवडीनिवडी, विविध विषयांवरील तिची मतं शेअर केली. याचवेळी तिने कोणालाही तिच्याबद्दल माहीत नसलेली एक गोष्टही सांगितली.

neena kulkarni
“मी जिवंत आहे”, निधनाची अफवा पसरल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Kajol reveals weirdest rumour about her
काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?
Esha Deol With Parents
ईशा देओलला चौथीत असताना वडील धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाबद्दल आईने सांगितलं अन्…; ‘अशी’ होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया
Ladki Bahin Yojana petitioner Anil Wadpalliwar claims that his life has been threatened
‘लाडकी बहीण योजना’ याचिकाकर्त्यांचा खळबळजनक दावा, म्हणाले “माझ्या जीवाला…”
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल
Shreya Bugde And Usha Nadkarni
“सगळे तिला खूप घाबरतात”; श्रेया बुगडे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णींविषयी म्हणाली, “ती खूप प्रेमळ…”
wife was keeping Physical relationship with customers for money after husband goes to work
पती कामावर जाताच पत्नी पैशासाठी ठेवायची ग्राहकांशी शारीरिक संबंध

आणखी वाचा : स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, दोघांमधील नात्याबद्दल कळल्यावर ‘अशी’ होती मुग्धा वैशंपायनची प्रतिक्रिया

आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांबाबत तिला खूप कुतूहल आहे. स्वप्न कशी पडतात, ती आपल्या कशी लक्षात राहतात, आपण झोपल्यावर आपला मेंदू कशाप्रकारे काम करतो याबद्दल जाणून घ्यायला तिला खूप आवडतं. एक दिवस याबद्दलचं एक भाषण ऐकताना त्यात सांगितलेली एक ट्रिक तिने आचरणात आणायचं ठरवलं. त्यानुसार जेव्हा शुटींग नसेल तेव्हा सकाळी तिला आदल्या रात्री स्वप्नात कोण दिसलं? ती एखादी जागा होती का? की माणसं होती? घडलेली गोष्ट दिसली? की घडणार आहे अशी गोष्ट दिसली? हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करते.

हेही वाचा : लाल रंगाचे केस अन्…; ऐतिहासिक मालिकेचं शूटिंग संपताच स्पृहा जोशीने बदलला लूक, चाहते म्हणाले…

मुख्य म्हणजे या सगळ्या गोष्टी ती तिच्या डायरीमध्ये लिहून ठेवते. ती तिच्या डायरीमध्ये तिला पडलेल्या स्वप्नांबद्दल लिहिते हे आतापर्यंत कोणालाही माहीत नव्हतं. हे तिच्या घरच्यांनाही माहीत नाही असा खुलासा तिने यावेळी केला.