मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा जोशी. तिच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अभिनयाबरोबर तिनं कविता, लेखन, सूत्रसंचालन आणि निरागस चेहरा यामुळे प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. स्पृहा जोशीही प्रचंड फूडी आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने तिच्या सासूबद्दल भाष्य केले.
स्पृहा जोशीने नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या सासूकडून काय शिकलीस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तिने सासूला काय नावाने आवाज देते? याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : सासू, नवरा आणि वडील शाकाहारी असतानाही स्पृहा जोशी मांसाहार प्रेमी कशी? उत्तर देत म्हणाली…
“मी वरदच्या आईलाही अगं आई अशीच हाक मारते. त्याची आई नाचणीच्या पिठाची उकड, तांदळाची उकड फार छान करतात. ती साधी आमटीही छान करतात. मी त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी बनवायला शिकले. माझ्या आईकडे आमटी-भात असं काही नसायचं”, असे स्पृहा जोशीने म्हटले.
“पण माझ्या सासरी रोजच्या जेवणात आमटीही असते. त्यात तुरडाळीची, चिंच आणि गुळाची आमसूल घातलेली, मसूर डाळीची लसूण फोडणीला देऊन केलेली, तूर डाळीची, मूगडाळीची अशा विविध आमट्या त्यांच्या घरी केल्या जातात. मूगडाळीची आमटी ही फार क्वचित केली जाते. मी तिच्याकडून या सर्व गोष्टी शिकले”, असे स्पृहाने म्हटले.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य
दरम्यान, स्पृहा जोशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिच्या ‘लोकमान्य’ मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सध्या ती ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमात व्यस्त आहे. याच प्रयोग सुरू आहेत.