छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत स्पृहा जोशी हे नाव कायमच असते. एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून तिला ओळखले जाते. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. काही दिवसांपूर्वी मांसाहारी पदार्थांवर ताव मारण्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले होते. आता तिने मांसाहार करण्यामागील कारण सांगितले आहे.
स्पृहा जोशीने नुकतंच ‘आसोवा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मांसाहारी पदार्थांवर ताव मारला. या मुलाखतीत तिने तिच्या मांसाहार खाण्याची सुरुवात कुठून झाली, याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य
“मी लहानपणापासूनच मांसाहार प्रेमी आहे. मी पहिल्यापासूनच फूडी आहे. माझी आई उत्तम मासे, चिकन करते आणि माझी आजीही उत्तम जेवण बनवते. आमच्या घरी सर्व खेळाडू आहेत. माझे आजोबा बॅडमिंटनपटू होते. आम्ही दोघी बहिणीही खेळ खेळायचो. त्यामुळे डाएटसाठी खरंतर मासांहार करणं फार गरजेचे असते. त्यातून तुम्हाला प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे मग आमच्या घरी मासांहार केला जातो”, असे स्पृहा जोशी म्हणाली.
“पण माझे बाबा शाकाहारी आहेत. बाबा पहिल्यापासूनच अजिबात मासांहार करत नाहीत. आता आता अंड खाऊ लागले आहेत. मी, आई आणि माझी बहिण आम्ही तिघीही कट्टर मासांहार प्रेमी आहोत. बाबा शाकाहारी असले तरी दर आठवड्याच्या शेवटी ते आम्हाला बाहेर मासांहारी पदार्थ खायला घेऊन जायचे. कारण घरात तितकं बनवता येत नव्हतं. त्यामुळे मासांहार करण्याची सवय ही लहानपणापासून लागली”, असेही तिने सांगितले.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या नातवाचे झालं बारसं, नावाचा अर्थ माहितीये का?
“मला उत्तम नॉनव्हेज बनवता येते. पण माझ्या सासरच्या घरी मला करता येत नाही. कारण सासूबाई आणि नवरा दोघेही शाकाहारी आहेत. त्यामुळे मी मित्र-मैत्रिणींच्या घरी गेले की तिकडे हे सर्व बनवते”, असेही स्पृहा जोशी म्हणाली.