अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. मराठी बरोबरच त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्या नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसतात.आज १० नोव्हेंबर सुचित्रा बांदेकर यांचा वाढदिवस आहे. आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सुचित्रा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- “मी चांगल्या कामाच्या शोधात…” प्रसिद्ध मराठी अभिनेता काम मिळवण्यासाठी करतोय धडपड, म्हणाला “प्रामाणिक प्रयत्न…”

आदेश आणि सुचित्रा बांदेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. सुचित्रा बांदेकर ‘रथचक्र’ या मालिकेत काम करत असताना दोघांची पहिली भेट झाली होती. पहिल्या नजरेतच आदेश बांदेकर त्यांच्या प्रेमात पडले होते. सुचित्रा यांच्या घरून त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. सुचित्रा यांच्या वाढदिवासानिमित्त आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुचित्रा आणि आदेश यांचे जुने-नवीन फोटो आहेत. आदेश बांदेकर यांनी या फोटोला ‘नसतेस घरी तू जेव्हा’ हे मराठी गाणं लावल आहे. हा व्हिडीओ शेअर करत आदेश बांदेकर यांनी ‘सुचित्रा वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अस कॅप्शन दिलं आहे.

आदेश बांदेकर आणि सुचित्रा यांचा प्रेमविवाह आहे. आदेश बांदेकर यांनी प्रपोज करताच त्यांनी लगेचच होकार दिला. होकारानंतर दोघांमध्ये जवळीक आणखीनच वाढत गेली. पण सुचित्राचे वडील कडक शिस्तीचे होते. कुटुंबियांना कळू न देता दोघंही भेटायचे. सुचित्रा यांच्या घरून दोघांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. त्यांच्या लग्नाला ३२ वर्ष पूर्ण झाली आहेत.