सुप्रिया पाठारे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मालिका, चित्रपट नाटकाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सुप्रिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून त्या चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकतीच सुप्रियांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
सुप्रिया यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अभिनेता प्रथमेश परबबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सुप्रिया यांनी लिहिलं “मी आणि पप्या भेटलो की गप्पा संपतच नाही.” फोटोमध्ये प्रथमेश जेवताना दिसत आहे आणि जेवता जेवता तो सुप्रियांबरोबर गप्पा मारताना दिसत आहे. सुप्रियांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “मराठी कलाकारांनी एकमेकांना साथ दिली तरच आपण कला क्षेत्रात पुढे जाऊ शकू, बिन कामाचे गट पाडून काहीच फायदा नाही.” तर दुसऱ्याने ‘भाईची केळवण’ अशी कमेंट केली आहे.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारेने ठाण्यात स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. या हॉटेलच्या उद्घाटनाला मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मिहिर हा प्रोफेशनल शेफ. सुरुवातीला त्याने ठाण्यात फूड ट्रक सुरू केला होता. आता त्याने आपलं स्वत:चं हॉटेल सुरू केलं आहे. सोशल मीडियावर या हॉटेलचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते.