मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) फलाट क्रमांक १० व ११च्या विस्तृतिकरणाचे काम हाती घेतलं आहे आणि ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच व सहाच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून ते २ जूनपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आहे. पण मध्य रेल्वेच्या या मेगाब्लॉकचा मोठा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला आहे. ठाणे, मुलुंड, ऐरोली येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोडींला अभिनेत्री सुप्रिया पाठारे देखील त्रस्त झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या ‘साधी माणसं’ मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी नुकताच इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी वाहतूक कोंडी झाल्यामुळे झालेल्या त्रासाचा अनुभव सांगितला आहे. त्यांना ठाणे ते मढला जाण्यासाठी तब्बल पाच तास लागले आहेत. त्यामुळे त्यांनी लोकांना महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा असं आवाहन केलं आहे.

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रताप, प्रथमेश परबचा फहाद फासिलच्या ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “खतरनाक…”

सुप्रिया पाठारे व्हिडीओत म्हणाल्या, “नमस्कार मी सुप्रिया पाठारे, माझं शूटिंग मढला असतं. मी आता ठाण्यावरून सकाळी आठ वाजता निघाले आणि आता साडे बारा झालेत. तरी अजूनही मी मढला पोहोचलेली नाही. प्रवासात मला पाच तास होऊन गेलेले आहेत. घोडबंदर रोड पूर्णपणे जाम आहे. एक-एक तास गाड्या एका जागी थांबवून ठेवत आहेत आणि मुलूंड-ऐरोलीच्या ब्रीजच्या इथे कुठेतरी कंटेनर पलटी झालाय म्हणून तिथेही वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर प्लीज घराबाहेर पडू नका कारण खाण्या-पिण्याचे खूप हाल होतायत आणि दुसरी गोष्ट नाटकवाल्यांसाठी त्यांचा प्रयोग असेल चार किंवा साडे चारला तर त्यांनी प्लीज वेळेत निघा. कारण खूप वाहतूक कोंडी आहे सगळीकडून तर तुम्ही अडकायला नको म्हणून…धन्यवाद.”

हेही वाचा – ‘बिग बॉस १६’ विजेता रॅपर MC Stanला झालंय तरी काय? आधी केली देवाकडे मृत्यूसाठी प्रार्थना आता म्हणतोय…

हेही वाचा – अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये ४२४ कोटींच्या व्हिलात कॅटी पेरी करणार परफॉर्म; अंबानींनी किती दिलं मानधन?

सुप्रिया पाठारेंच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच काही जणांनी वाहतूक कोडींमधला आपला देखील अनुभव सांगितला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress supriya pathare stuck in thane traffic share video pps
First published on: 31-05-2024 at 15:09 IST