‘पुढचं पाऊल’, ‘मोलकरीण बाई’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा बऱ्याच मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या सुप्रिया पाठारे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या ‘महाराजा हॉटेल’मुळे त्या सातत्याने चर्चेत असतात. या हॉटेलविषयी सोशल मीडियावरद्वारे सुप्रिया पाठारे नवनवीन अपडेट देत असतात. मध्यंतरी हे हॉटेल सतत बंद केलं जात होतं आणि अखेर दोन महिन्यांनंतर त्यांचं हॉटेल सुरळीत सुरू झालं. पण हॉटेल सुरळीत सुरू करण्यासाठी सुप्रिया पाठारे यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. यासाठी त्यांनी स्वतःचे सगळे दागिने विकले, याचा खुलासा नुकताच त्यांनी एका मुलाखतीमधून केला.
अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लेकाच्या साथीने ‘महाराजा हॉटेल’ सुरू केलं होतं. त्यानंतर या हॉटेलला अनेक कलाकार मंडळी हजेरी लावू लागले. हॉटेलला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. पण काही काळाने या हॉटेलवर अनेक संकट आली. कधी हॉटेलचा स्टाफ पळून गेला, तर कधी लेक मिहिरा पाठारेला इजा झाली. यामुळे हॉटेल दोनदा बंद करावं लागला. यामुळे सुप्रिया पाठारे मोठ्या तोट्यात गेल्या. पुन्हा हॉटेल सुरू करण्यासाठी त्यांनी दुसऱ्याकडून पैसे न मागता स्वतःचे दागिने विकले.
हेही वाचा – सतत दोनवेळा हॉटेल झालेलं बंद, सुप्रिया पाठारे कारण सांगत म्हणाल्या, “शत्रूवरही अशी वेळ येऊ नये…”
‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना अभिनेत्री सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “मी यावेळेला सगळे दागिने विकून सगळ्या गोष्टी केल्या. कारण आलेल्या संकटांमधून बाहेर पडणं अशक्य होतं. कोणाकडून पैसे घ्यायचे, मग आपलं सगळं व्यवस्थित करायचं ते ठीक आहे. पण मला अंदाज नव्हता किती महिने असं काढावं लागणार आहे. त्यामुळे ज्याच्याकडून पैसे घेतलेत त्याला किती वेळ तंगवत ठेवायचं, हे मला पटलं नाही.”
हेही वाचा – Video: “बडे दिल वाला…”, लेकीच्या लग्नातील आमिर खानची ‘ती’ कृती पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले….
“मला असं वाटतं स्त्री धन म्हणतात ते त्याच्यासाठीच असतं. स्त्रीच्या अडचणीसाठी उपयोगात आणलेलं ते स्त्री धन म्हणू. त्यामुळे ते मी उपयोगात आणलं आणि मला त्याचं काही वाईट वाटतं नाही. अरे यार मला याच्यासाठी हे करावं लागलं. ठीक आहे ते माझं स्वप्न आहे, मुलाचं स्वप्न आहे. ते उभं राहण्यासाठी कराव्या लागतायत त्या गोष्टी कराव्यात. पण या सगळ्यासाठी सावध असावं लागतं,” असं सुप्रिया पाठारे म्हणाल्या.