विविध मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी बंद झालेल्या ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील त्याची माधवी कानिटकर उर्फ माईची भूमिका प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस पडली होती. त्यामुळे आता सुप्रिया कोणत्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसऱ्याबाजूला सुप्रिया त्यांच्या ‘महाराज हॉटेल’मुळे सातत्याने चर्चेत आहेत. पण हे ‘महाराज हॉटेल’ मध्यंतरी सतत बंद, चालू होत होतं. यामागचं नेमकं काय होतं? याचा खुलासा सुप्रिया पाठारे यांनी केला आहे.

‘लोकमत फिल्मी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना अभिनेत्री सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “हॉटेल बंद होण्यामागचं पहिलं कारण होतं स्टाफचं गेला. मी नवीन जे हॉटेल सुरू करतात त्या लोकांना सांगेन, हे मी शिकले आहे. माझी पहिली वेळ होती. काही गोष्टी माहित नव्हत्या. एका गावातले, एका घरातले नातेवाईक असतात जे एकमेकांबरोबर काम करायला येतात, असे एकाच कुटुंबातील लोकं स्टाफमध्ये ठेवू नका. कारण जसे ते एकत्र येतात. तसेच ते एकत्र जातात. यामुळे मी इतकी शॉकमध्ये होते.”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

पुढे तो प्रसंग सांगत अभिनेत्री म्हणाल्या, “आम्ही हॉटेल बंद करून घरी आलो. त्यानंतर मिहिर म्हणाला, मी जरा स्टाफ रूमला जाऊ येतो, उद्याच्या काय गोष्टी आहेत बघू येतो. मिहिर स्टाफ रूमला गेला तर पाचही जण गायब होते. म्हणजे पाचही जण स्वतःचा बोजा बिस्तारा घेऊन गेले. त्यांनी याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. गेले म्हणजे कुठे गेले?, असा प्रश्न पडला होता. मला मिहिर म्हणतं आला, सगळे निघून गेले कुठेच नाहीये. मी म्हटलं, कदाचित हॉटेलमधून आले नसतील. तो म्हणाला, हॉटेलमधून आले ते. मी म्हटलं, मग ते कुठे गेले? तो फोनवर फोन करतोय. पण कोणीही फोन उचलेना. काहीच प्रतिसाद नाही. अक्षरशः आमचं असं झाला हा काय प्रकार आहे. त्यामुळे जे नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करतात त्यांनी या गोष्टीची काळजी घ्या. कारण महाराज बंद केलं त्यानंतर मी किती तोट्यात होते मला माहितेय. पैशांचा तर होतोच पण जो मानसिक होतो ना तो जास्त त्रासदायक होतो. मी कधी कोणाला कामगार म्हणून असं वागवत नाही. कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक देते.”

हेही वाचा – Video: “बडे दिल वाला…”, लेकीच्या लग्नातील आमिर खानची ‘ती’ कृती पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले….

त्यानंतर सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “आमच्या स्टाफमधील एका व्यक्तीला अंगावर देवी आल्या होत्या. तर मिहिर सांगत होतो त्याला चल मी तुला रुग्णालयात घेऊन जातो. पण त्याचं असं असायचं आम्ही जेव्हा गावी जाऊ तेव्हा ठीक होईल. त्यांची ही काय मानसिकता असते माहित नाहीये. पण हा गेला की तो गेला, तो गेला ना मग हा गेला म्हणजे अरे काय चाललंय? आपल्या समोर काही पर्याय उरत नाही. सप्टेंबर महिना जवळजवळ त्याच्यामध्ये गेला. ते झालं नाही तर १५ ते २० दिवसांनी आईचं कळालं. त्याच्यात मालिकेचे शेवटचे दिवस होते. मग खूप व्यस्त होते. शेवटी मिहिरला म्हटलं, स्टाफ येईल न येईल माहित नाही. आपण वाट बघायला नको, सुरू करूया. मी आहे करायला करतो सुरू, असं तो म्हणाला. हॉटेल सुरू केल्यानंतर तीन दिवस छान प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी मिहिरच्या हातावर वाफ आली. मिहिरचा हात पूर्णपणे भाजला. मध्यंतरी हॉटेल काही काळासाठी बंद झालं आणि सुरू झालं तेव्हा हे घडलं होतं. एक हात बाजूला ठेवून दुसऱ्या हाताने तो नाही बनवू शकत. मग झालं, आता काय करायचं?”

हेही वाचा – Video: “हा नागिन ड्रेस…”, लग्नातील आयरा खानचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले…

“मिहिरला म्हटलं, तू असा हात घेऊन कसं करणार? तुला लागलंय तर हे करणं अशक्य आहे. मग ते तीन दिवस सुरू झालं आणि चौथ्या दिवशी परत बंद झालं. चौथ्या दिवशी बनवलेला माल सगळा फेकून द्यावा लागला. कारण कांदा, टोमॅटो अशा गोष्टी आहेत, त्या कापून ठेवलेल्या राहत नाहीत. घरी वापरू शकतो. पण हॉटेलमध्ये जेव्हा आपण या गोष्टी करतो त्या जास्त प्रमाणात असतात. १५ किलो पेस्ट असं बरंच काही होतं जे फेकून द्यावं लागलं. मी पूर्णपणे गेले होते. आता असं वाटलं होतं की, खरंच पुन्हा सुरू होईल? पण काहीतरी करू म्हणतं आम्ही पुन्हा सुरू केलं. कारण नवरात्र, दिवाळीत हॉटेल बंदच होतं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही स्वतः हॉटेल शोधतं होतो जिथे शाकाहारी मिळेल. पण बसायला १ तास वेटिंग होते. त्यामुळे मला स्वतःचं हॉटेल बंद बघून खूप डोळ्यात पाणी येत होतं. आपलं स्वतःचं हॉटेल असताना आज आपल्याला दुसरीकडे खायला जावं लागतंय. दोन महिन्यांचा तो काळ फारच भयानक होता, शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये,” असं सुप्रिया पाठारे म्हणाल्या.