मराठी मनोरंजनसृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून सुरभी भावेला ओळखले जाते. तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. ‘स्वामिनी’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. नुकतंच सुरभीने दिवाळी आणि फटाके याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

सुरभी भावे हिने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो पोस्ट केला आहे. तिने तिच्या या पोस्टमध्ये चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच तिने दिवाळीत फटाके वाजवणे का बंद केले? याचे कारण सांगितले आहे.
आणखी वाचा : ‘सुका सुखी’ नव्हे तर महेश मांजरेकर ‘हे’ ठेवणार होते हॉटेलचे नाव, पण…

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Komal More
“शत्रूला पोत्यात भरून…”, ‘लाखात एक आमचा दादा’मधील तेजूच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल

सुरभी भावेची पोस्ट

“दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! ह्या निमित्ताने एक आवाहन हवेत आधीच खूप प्रदूषण आहे, त्यात फटाके वाजवून भर टाकण्या पेक्षा एकमेकांच्या घरी जाऊन भेटू शकतो किंवा उत्तम वाचन ,उत्तम सिनेमा ,उत्तम नाटक असे सर्व पाहून दिवाळी साजरी करू शकतो…

P.S आता जे मला उपदेशाचे डोस पाजतील की तू पण फटाके वाजवतच असशील वगैरे तर त्यांच्यासाठी, मी 4 थी मध्ये असताना कारगिल युद्ध झालेल. त्यावेळी मी फटाके न घेता गावात पैसे गोळा करून ते सैनिकांना दिलेले, तेव्हापासून मी जे फटाके वाजवणं बंद केलं ते आजतागायत मी फुलबाजी पण लावलेली नाही”, असे सुरभी भावेने म्हटले आहे.

सुरभीच्या या पोस्टवरुन अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तिने एका कमेंटवर प्रतिक्रिया देताना या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे. “माझा मूळ मुद्दा न कळताच अकलेचे तारे तोडणाऱ्या सर्वांना शुभ दीपावली … माझ्या आधीच्या पोस्टला उगाच ट्रोल करून timepass करणाऱ्यानोमी शहाणपण स्वतःकडे ठेवायचं की त्याचं प्रदर्शन मांडायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही…

पब्लिसिटीची गरज नाही, अभिनेत्री असल्याने अनेक जण ओळखतात… रोजगार मिळतो ते दिसतं पण फटाका बनवताना कित्येक बालमजूरांचं शोषण होत ,त्यांचा मृत्यू होतो ते नाही दिसत का … कारगिल च भांडवल करावं हा मुद्दा तुमच्या डोक्यातून आला माझ्या नाही ,नुसतं विवेकानंदांचा फोटो लावून काही होत नाही विचार आचरणात आणा… हा आता तुमचा फटाक्यांचा बिझनेस असेल तर झोंबेल तुम्हाला हे आणि हो मी हिंदू असल्याचा मला नितांत अभिमान आहे ह्यासाठी कुणाच्या सर्टिफिकेट ची गरज नाही, बाकी तुमचा शहाणपण घरात दाखवत असालच …गेट वेल सून अकलेचे रॉकेट उडवा आणि विचारांचे अनार उडवा … आणि हो लवकर डोळ्यावर पट्टी बांधली आहे ना ती सोडून बघा जग सुंदर दिसेल”, अशी कमेंट सुरभीने केली आहे.

surbhi bhave post
सुरभी भावे

आणखी वाचा : ‘नाळ’ चित्रपटातील ‘मणी’च्या भूमिकेतील अभिनेता आहे प्रसिद्ध निर्मात्याचा मुलगा, कशी झाली निवड? जाणून घ्या किस्सा

त्याबरोबरच सुरभीने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने “माझा मूळ मुद्दा न कळताच अकलेचे तारे तोडणाऱ्या सर्वांना शुभ दीपावली … माझ्या आधीच्या पोस्ट ला उगाच ट्रोल करून timepass करणाऱ्यानो अकलेचे रॉकेट उडवा आणि विचारांचे अनार उडवा … आणि हो लवकर डोळ्यावर पट्टी बांधली आहे ना ती सोडून बघा जग सुंदर दिसेल”, असा सल्लाही तिने दिला आहे.

दरम्यान सुरभी भावे ही ‘स्वामिनी’ या मालिकेमुळे चर्चेत आली. ती ‘पावनखिंड’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात झळकली. सुरभी ही सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते. सुरभीचं एक युट्यूब चॅनल देखील आहे.

Story img Loader