मराठी अभिनेत्री सुरभी भावे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुरभी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबाबत सुरभी पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना माहिती देते. याबरोबरच अनेकदा ती कुटुंबियांबरोबरचे फोटोही शेअर करताना दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या सुरभीला मात्र एका नेटकऱ्याकडून नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सुरभीकडे चाहत्याने व्हिडीओची मागणी केल्याचं समोर आलं आहे. याबाबत अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. एका नेटकऱ्याने सुरभीला इन्स्टाग्रामवर मेसेज करत “सेक्सी व्हिडीओ पाठव. तुला आवडतात का मी पाठवलेले व्हिडीओ” असा मेसेज केला होता. या नेटकऱ्याला सुरभीने सडेतोड उत्तर दिलं आहे. “तुझ्या आईला असे व्हिडीओ पाठव. त्यांना आवडले तर मी बघेन. याबाबत मी सायबर पोलिसांना कळवलं आहे”, असा रिप्लाय सुरभीने दिला आहे.
हेही वाचा>> “चांगला माणूस पण वाईट…” सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कॉमेडियन कपिल शर्माबाबत केलेलं विधान चर्चेत
सुरभीने याबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्टही शेअर केली आहे. या व्यक्तीने आधीही अनेकदा अश्लील व्हिडीओ पाठवल्याचं सुरभीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. “ह्यांनी मला अनेकवेळा अश्लील विडिओ पाठवले. पण मी सतत दुर्लक्ष केले. पण ह्या दोन दिवसांत पुन्हा पाठवले. मग मी रिप्लाय दिला ,जो रिप्लाय दिला तो सुद्धा ह्यात आहे…त्यांच्या आईचा ह्यात अवमान करणे हा उद्देश नव्हता, पण त्यांना झोंबल ते…अशा समस्त पुरुष वर्गाला सांगते, तुमची आई बहिण ही स्त्री आणि बाकी बायका काय तुमच्या मालकीच्या असतात का नीच लोकहो?? इथून पुढे असे मेसेजेस केले तर प्रत्येकाला असंच स्क्रीनशॉट पोस्ट करून सामाजिक ना** केले जाईल ह्याची नोंद घ्यावी. P.S. ह्याहून मला सभ्य भाषा वापरता येत नाही”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा>> ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने खरेदी केली Made In India गाडी; नव्याकोऱ्या महागड्या कारचा व्हिडीओ पाहिलात का?
सुरभीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. ‘स्वामिनी’ या मालिकेतून सुरभी घराघरात पोहोचली. तिने ‘पावनखिंड’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांत काम केलं आहे. ‘त्रिभंगा’ या काजोल देवगणच्या चित्रपटातही ती झळकली होती. सध्या ती ‘३६ गुणी जोडी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.