Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : गेल्या ७० दिवसांपासून चर्चेत असलेलं ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व रविवारी ( ६ ऑक्टोबर ) संपलं. मोठ्या दिमाखात यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्याला खास बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थित राहिली होती. लवकरच तिचा ‘जिगरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यानिमित्ताने तिने सहकलाकार वेदांग रैनाबरोबर ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी ती मराठी बोलताना पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेल्या १७ सदस्यांमधून सहा सदस्य महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचले. जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी असे अनुक्रमे हे सदस्य घराबाहेर झाले. अभिजीत आणि सूरज हे टॉप-२ सदस्य अंतिम फेरीपर्यंत राहिले. यामधील सूरज विजेता ठरला. तर अभिजीत उपविजेता ठरला. या ७० दिवसांच्या संपूर्ण प्रवासात अनेक मराठी कलाकारांनी आपापल्या आवडत्या सदस्यांना पाठिंबा दिला. त्यापैकी एक म्हणजे सुरेखा कुडची. हे पर्व सुरू झाल्यापासून सुरेखा कुडची सूरजला समर्थन देताना दिसल्या. महाअंतिम सोहळ्याच्या काही दिवसांआधी त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना सूरजला मत देण्यासाठी आवाहन देखील केलं होतं. त्यामुळे सूरज ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. सूरजच्या विजयावर नुकतीच त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “१० वर्ष प्रायोगिक नाटकं, साडेतीन वर्ष मालिका करून…”, सूरज चव्हाण जिंकल्यावर अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हा झापूक झुपूक बोलून…”

“सूरज तुला खूप खूप शुभेच्छा,” असं कॅप्शन लिहित सुरेखा कुडची यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, “नमस्कार, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले काल झाला आणि निकाल लागला आहे. सूरज चव्हाण निवडून आला आहे. खूप सुरुवातीपासून मी त्याला पाठिंबा देत होते. सूरज निवडून आल्यामुळे मला मनापासून आनंद झाला. बऱ्याच लोकांना असं वाटतं होतं की, तू घरात काहीच करत नाहीये. खेळत नाहीये. त्यामुळे याला विजेता कसं काय केलं? असो. पण तू त्या प्रत्येकाला ते करून दाखवलं आणि तोंड बंद केलीस; ज्यांना वाटतं होतं, तू खेळत नाहीये. ठीक आहे. तुला खेळ समजत नव्हता. तुला थोडा वेळ लागला. पण तू खेळलास. तू छान खेळलास आणि सगळ्यांची मनं जिंकली आहेस. तुला खूप खूप आशीर्वाद, पुढल्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. केदार शिंदे तुला पुढल्या चित्रपटात काम देतायत त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन.”

हेही वाचा – ट्रॉफी घेऊन सूरज आला माध्यमांसमोर! हटके लूकने वेधलं लक्ष, ‘बिग बॉस’शी आहे खास कनेक्शन, फोटो एकदा पाहाच

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस १८’च्या घरात एन्ट्री केल्यानंतर काय घडलं? ते काय म्हणाले? जाणून घ्या…

दरम्यान, सुरेखा कुडची यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुम्ही खूप पाठिंबा दिला तेव्हाच वाटलं आपला सूरज विजयी होणार.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मला पहिल्या दिवसापासून वाटलं होतं सूरज जिंकणार आणि तसंच झालं. माणसाची इच्छा शक्ती प्रबळ असेल तर काही पण शक्य होऊ शकत, हे सूरज चव्हाणने सिद्ध करून दाखवलं. माझ्याकडून पण सूरजचे अभिनंदन.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress surekha kudchi first reaction on suraj chavan winner of bigg boss marathi season 5 pps