‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून स्वानंदी टिकेकरला ओळखले जाते. नुकतंच स्वानंदीने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली. स्वानंदी लवकरच प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच स्वानंदीच्या या पोस्टवर तिचे वडील उदय टिकेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वानंदीने काल (२० जुलै) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने गायक आशिष कुलकर्णीबरोबर फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना तिने “आमच्या दोघांचं ठरलं”, असे कॅप्शन दिले होते. त्याबरोबर तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला होता.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
sharad ponkshe reacts on trolling about daughter education
लेकीला शिकायला अमेरिकेला पाठवल्याने अजूनही होतंय ट्रोलिंग; शरद पोंक्षे म्हणाले, “काही लोकांच्या…”
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”

तिच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. स्वानंदीच्या या पोस्टवर तिचे वडील उदय टिकेकर यांनी कमेटं केली आहे. उदय टिकेकर यांनी “तुम्हाला माझा आशीर्वाद” असे म्हटलं आहे.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

त्यावर आशिष कुलकर्णीने कमेंट करत “पुण्याला लवकर या काका”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर उदय टिकेकरांनी “उद्याच”, असे म्हटले आहे. आशिषची ही कमेंट वाचून एकाने “काका नाही बाबा किवा मामा म्हणं” असे म्हटले आहे. त्यावर उदय टिकेकरांनी हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. तर स्वानंदीने वडिलांच्या कमेंटवर तीन हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

uday tikekar comment
उदय टिकेकर कमेंट

आणखी वाचा : “तिची मतं, कृती मला पटत नाही, पण…”, देवेंद्र फडणवीसांनी अमृता फडणवीसांबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “महिलांनी इतकी…”

दरम्यान स्वानंदीने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत मिनल हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर तिने ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई’ या मालिकांमध्येही झळकली होती.

स्वानंदी ही उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच गायिका देखील आहे. ती सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या गाण्याच्या पर्वाची विजेती ठरली होती. तसेच तिने ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे.

Story img Loader